ओटीटीवरील लोकप्रिय वेब सीरिज ‘पंचायत’चा तिसरा भाग आला आहे. या सीरिजची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. प्रेक्षक या सीरिजची आतुरतेने वाट पाहत होते. आधीच्या दोन सीझनप्रमाणेच या सीझनमध्येही फुलेरा गाव, या गावातील गावकरी, सचिव अन् आमदार यांच्या रंजक गोष्ट प्रेक्षकांना भावली आहे. २८ मे रोजी प्रदर्शित झाल्यापासूनच ही सीरिज प्राइम व्हिडीओवर ट्रेंड करत आहे. या सीरिजमध्ये सचिव अभिषेक त्रिपाठीचे पात्र अभिनेता जितेंद्र कुमार साकारत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पंचायत ३’ च्या निमित्ताने जितेंद्र कुमारचा इंजिनिअर असून अभिनेता होण्याचा रंजक प्रवास जाणून घेऊयात. अभ्यासात हुशार असलेला व आयआयटी खरगपूरमधून डिग्री घेणारा जितेंद्र ‘पंचायत’चा सचिव कसा झाला? यामागची गोष्ट खूपच फिल्मी आहे.

निर्मात्यांबरोबर भांडण अन् ‘पंचायत’ सीरिज सोडण्याबद्दल जितेंद्र कुमार म्हणाला, “एक वेळ अशी आली की…”

जितेंद्र कुमारची कौटुंबिक पार्श्वभूमी

जितेंद्रचा जन्म १ सप्टेंबर १९९० मध्ये राजस्थानमधील खैरथल इथं झाला. त्याने आयआयटी खरगपूरमधून सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. त्याला सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड होती पण त्याला करिअर इंजिनिअरिंगमध्येच करायचं होतं. तो लहान असताना रामलीलामध्ये अभिनय करायचा. तो अमिताभ बच्चन आणि नाना पाटेकर यांची मिमिक्री करायचा, तसेच तो अभ्यासात खूप हुशार होता.

४० फ्लॉप चित्रपट देऊनही ‘हा’ अभिनेता थाटात जगतो आयुष्य, तब्बल ‘इतक्या’ कोटींच्या संपत्तीचा आहे मालक

जितेंद्र कुमारचं शिक्षण

जितेंद्र कुमारने जेईई परीक्षा उत्तीर्ण केली. ही सर्वात कठीण परीक्षा आहे. जेईई मेन आणि जेईई ॲडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने आयआयटी खरगपूरमध्ये प्रवेश घेतला. जितेंद्र कुमारचे वडील देखील बी. टेक इंजिनिअर होते आणि त्यामुळे त्याला वडिलांप्रमाणेच इंजिनिअर व्हायचं होतं. त्याने त्यादिशेने अभ्यास करत प्रवेश मिळवला व आयआयटी खरगपूरमधून बी टेक केले.

मुनव्वर फारुकीच्या दुसऱ्या लग्नाचा पहिला फोटो आला समोर, दोघांनी केक कापून दिल्या पोज, पाहा PHOTO

जितेंद्र कुमारला कसा मिळाला पहिला शो?

आयआयटी खरगपूरमध्ये शिकत असताना जितेंद्र कुमार नाटकही करायचा. त्यावेळी त्याची भेट द व्हायरल फिव्हचे एक्झिक्युटिव्ह क्रिएटिव्ह डायरेक्टर विश्वपती सरकार यांच्याशी भेट झाली. ते जितेंद्रचे सिनिअर होते, पण सरकार यांनी त्याला टीव्हीएफ जॉईन करण्यास सांगितले.

प्रसिद्ध अभिनेत्रीने हटवले लग्न अन् गुढीपाडव्याचे फोटो, तीन महिन्यांतच घेणार मराठमोळ्या पतीपासून घटस्फोट?

खरगपूरमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर जितेंद्र तीन महिने बेरोजगार होता, त्यानंतर बंगळुरूमधील एका जपानी कंपनीत त्याला नोकरी मिळाली. पण त्यानंतर विश्वजीत सरकार यांनी त्यांना टीव्हीएफसाठी बोलावलं. जितेंद्र त्यांना भेटायला गेला आणि त्याला तिथे त्याचा पहिला शो ‘मुन्ना जज्बाती’ भेटला. ही सीरिज हिट झाली आणि जितेंद्रने मागे वळून पाहिलं नाही. त्याने ‘कोटा फॅक्टरी’, ‘बॅचलर’, ‘ड्राय डे’, ‘जादुगर’, ‘चमन बहार’, ‘पंचायत’, ‘ड्राय डे’ यांसारख्या वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panchayat 3 fame jitendra kumar is iit passed out how he became actor know journey hrc