‘पंचायत’ या लोकप्रिय वेब सीरिजमधील कलाकारांची खूप चर्चा असते. याच सीरिजमध्ये गणेश हे पात्र साकारून लोकप्रिय झालेला अभिनेता आसिफ खानने लग्न केलं आहे. त्याने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करून ही माहिती दिली. आसिफने झेबाशी १० डिसेंबरला निकाह केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पंचायत’ फेम आसिफ खानने त्याची गर्लफ्रेंड झेबा हिच्याशी १० डिसेंबर रोजी निकाह केला. त्याने गुरुवारी लग्नाचे फोटो शेअर केले. आसिफ व झेबा यांचा निकाह पारंपरिक पद्धतीने पार पडला. आसिफने क्रीम कलरची शेरवानी या खास दिवसासाठी निवडली होती. तर झेबाने गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. “कुबूल है. 10.12.24 – ♾️” असं कॅप्शन देत आसिफने फोटो शेअर केले.

हेही वाचा – रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?

पाहा फोटो –

एका फोटोत आसिफ झेबाच्या कपाळावर किस करताना दिसतोय. तर दुसऱ्या फोटोत तो व झेबा एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. आसिफने लग्नाचे फोटो शेअर केल्यावर त्याचे चाहते आणि इंडस्ट्रीतील मित्र त्याचं नवीन प्रवासासाठी अभिनंदन करत आहेत. शारिब हाश्मी, मौनी रॉय आणि इतर अनेकांनी दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने आसिफ व झेबाला इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत.

सोनाक्षी सिन्हाची पोस्ट (फोटो – इन्स्टाग्राम)

आसिफ खानच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तो शेवटचा रितेश देशमुख, सोनाक्षी सिन्हा आणि साकिब सलीम यांच्याबरोबर ‘काकुडा’ चित्रपटामध्ये दिसला होता. तो पुढे राशिक खानच्या सेक्शन 108 मध्ये दिसणार आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panchayat fame aasif khan married to girlfriend zeba see wedding photos hrc