Panchayat Season 4: ‘प्राइम व्हिडीओ’वरील लोकप्रिय वेब सीरिज ‘मिर्झापूर’चा चित्रपट येणार असल्याची नुकतीच घोषणा करण्यात आली. २०२६ रोजी ‘मिर्झापूर’ सीरिजचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अशातच आता ‘प्राइम व्हिडीओ’ने एक घोषणा करून चाहत्यांमधील उत्सुकता वाढवली आहे. बहुचर्चित आणि लोकप्रिय ‘पंचायत’ सीरिजच्या चौथ्या सीझनची घोषणा झाली असून चित्रीकरणाला देखील सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा फुलेरामध्ये पंचायत होणार आहे.

भारतासह २४० देशांमध्ये मनं जिंकणाऱ्या बहुचर्चित कॉमेडी-ड्रामा ‘पंचायत’च्या चौथ्या सीझनच्या चित्रीकरणाचे फोटो ‘प्राइम व्हिडीओ’ने शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेता जितेंद्र कुमार, चंदन रॉय आणि फेजल मलिक दिसत आहेत. द व्हायरल फीवर ( TVF ) ‘पंचायत ४’ ( Panchayat Season 4 ) सीरिजची निर्मिती करत आहे. तर दीपिक कुमार मिश्रा आणि अक्षय विजयवर्गीय यांच्यावर दिग्दर्शनाची धुरा आहे.

MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
suriya move to mumbai with wife jyothika and children
‘हा’ साऊथ सुपरस्टार पत्नी अन् मुलांसह मुंबईत झाला स्थायिक; म्हणाला, “या शहरातील शांती आणि…”
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
Best Movies On Prime Video
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये घरबसल्या पाहता येतील ‘हे’ चित्रपट; प्राइम व्हिडीओवरील उत्तम सिनेमांची यादी
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”

हेही वाचा – Video: लाइव्ह कॉन्सर्टमध्ये सोनू निगमच्या समोर अचानक आला मद्यपी अन् मग…; पाहा व्हिडीओ

‘पंचायत ४’ ( Panchayat Season 4 )मध्ये जितेंद्र कुमार, चंदन रॉय, फेजल मलिक यांच्या व्यतिरिक्त रघुबीर यादव, नीना गुप्ता, सांविका, दुर्गेश कुमार, सुनीता राजवार आणि पंकज झा महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. या सीझनमध्ये ओरिजनल स्टारकास्टसह नवीन कलाकार देखील पाहायला मिळणार आहेत.

हेही वाचा – Video: “लवकर लग्न करा”, ‘बिग बॉस मराठी’ फेम वैभव चव्हाण आणि इरिनाच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्हाला वहिनी हिच पाहिजे”

‘पंचायत ४’ कथा काय असणार? ( Panchayat Season 4 Story )

मागील सीझनची पुढची कथा ‘पंचायत ४’मध्ये ( Panchayat Season 4 ) पाहायला मिळणार आहे. लाडके सचिव जी परीक्षा देण्यासाठी शहरात जातात. याच वेळी प्रधानचे ( नीना गुप्ता) पती रघुवीर यादववर कोणीतरी गोळी झाडतं. हे संपूर्ण प्रकरण राजकारण संबंधित आहे. ‘पंचायत ४’मध्ये हृदयस्पर्शी कथा पाहायला मिळणार आहे. ही कथा भावनिक असणार असल्याचं म्हटलं जात आहे. ‘पंचायत’चा चौथा संपूर्ण सीझन निवडणुकांवर आधारित असणार आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18: अखेर विवियन डिसेना आणि करणवीर मेहरामध्ये पडली वादाची ठिणगी, करण म्हणाला, “एक नंबरचा मुर्ख माणूस”

तसंच या सीझनमध्ये विशेषतः तीन कथा असू शकतात. पहिली, निवडणुकीवरून झालेली गदारोळ, दुसरी, सचिव आणि रिंकीची प्रेमकहाणी, नंतर कॅटचा निकाल आणि तिसरा, प्रल्हाद निवडणुकीत सहभाग घेणार की नाही या तीन कथा असू शकते.

‘पंचायत ४’ सीरिज कधी प्रदर्शित होणार? ( Panchayat Season 4 Release Sate )

‘पंचायत’चा पहिला सीझन २०२०मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर २०२२मध्ये दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आला होता आणि तिसरा सीझन यंदा प्रदर्शित झाला. त्यामुळे आता ‘पंचायत’चा चौथा सीझन ( Panchayat Season 4 ) २०२६ प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Story img Loader