पंकज त्रिपाठी यांची मुख्य भूमिका असलेला ‘मैं अटल हूं’ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचा जीवनप्रवास दाखवण्यात आला आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेते फिल्ममेकर रवी जाधव यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी संसदेत बैलगाडीवर येण्यापासून ते संयुक्त राष्ट्रात विरोधी पक्षनेते म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करेपर्यंत, वाजपेयी एक असा राजकीय वारसा मागे सोडून गेले आहेत, ज्याचा विरोध फार कमी लोक करतात. भारताच्या धोरणात्मक विचारांवर अटलबिहारी वाजपेयी यांचा प्रभाव निर्णायक आणि अपरिवर्तनीय होता. भारताला जगाच्या अण्वस्त्रधारी देशांच्या यादीत आणणे, दूरसंचार क्रांतीची स्थापना करणे, कारगिल युद्ध यशस्वीरित्या संपवून जिंकण्याच्या देशसंबंधी अनेक धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

“तो डुकराप्रमाणे खातो आणि श्वानासारखा…”, प्रसिद्ध अभिनेत्याचे सलमान खानबद्दल विधान; म्हणाला, “त्याच्या वडिलांनी…”

भानुशाली स्टुडिओज लिमिटेड आणि लेजंड स्टुडिओज बॅनरखाली विनोद भानुशाली, संदीप सिंग आणि कमलेश भानुशाली यांची निर्मिती असलेला हा सिनेमा १४ मार्च रोजी झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

पंकज त्रिपाठी चित्रपटाबद्दल म्हणाले, “आपल्या देशाची यशस्वी पायाभरणी करणाऱ्या देशातील सर्वात नामवंत नेत्यांपैकी एकाची भूमिका वठवण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी खरा सन्मान होता. मला अटलजी आणि त्यांच्या उल्लेखनीय राजकीय प्रवासाची जाणीव होतीच, मात्र या सिनेमाच्या निमित्ताने मला त्यांच्या जीवनातील आणखी अनेक प्रेरणादायी गुण आणि पैलूंची ओळख करून घेता आली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने माझ्या जीवनावर एक अमीट छाप सोडली आहे. अटलबिहारी वाजपेयी यांची व्यक्तिरेखा उभी करणे हे खरोखरच माझ्या कारकिर्दीतील ठळक वैशिष्ट्यांपैकी आहे. त्यासाठी मी आभार व्यक्त करतो. आता हा सिनेमा झी 5 वर येतोय, म्हणून सर्वांना या साध्या माणसाची उल्लेखनीय कथा पाहण्याची आणि त्यातून धडे घेण्याची विनंती करतो”.

राखी सावंत बुरख्याच्या आत बिकिनी घालून…; फराह खानने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “तिच्याबरोबर काम करणं…”

दिग्दर्शक रवी जाधव म्हणाले, ‘मैं अटल हूं’ साठी पंकज त्रिपाठी हा एकमेव पर्याय होता. कारण त्याच्याकडे या प्रतिष्ठित व्यक्तीमधील सौम्य गुण आहेत. त्याने या चित्रपटाचा भाग होण्यास सहमती दर्शवली याचा मला आनंद वाटतो. कारण पंकजच्या सहभागाने हा प्रवास खरोखरच अधिक उल्लेखनीय झाला. ‘मैं अटल हूं’ ही अटलजींना वाहिलेली आमची छोटीशी आदरांजली आहे – ते एक प्रेरणादायी नेते होते, स्वत: काळाच्या खूप पुढे होते आणि आता हा सिनेमा झी 5 वर प्रदर्शित होणार आहे. जगभरातील प्रत्येक भारतीयाच्या मनात आणि हृदयापर्यंत हा सिनेमा पोहोचेल ही प्रामाणिकपणे आशा मला वाटते. कारण या दूरदर्शी माणसाकडून शिकण्यासारखे आणि आत्मसात करण्यासाठी बरेच काही आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaj tripathi starrer main atal hoon will be released on zee 5 on this date hrc