Phir Aayi Hasseen Dillruba: हसीन दिलरुबा या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली होती. तापसी पन्नू, विक्रांत मेस्सी यांच्या या सिनेमात भूमिका होत्या. आदित्य श्रीवास्तवचीही या सिनेमातही उत्तम भूमिका होती. तो सिनेमा २०२१ मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. आता ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ ( Phir Aayi Hasseen Dillruba ) या सिनेमाचा ट्रेलर आला आहे. या सिनेमाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. थरार, उत्कंठा, गूढ या सगळ्या भावना या ट्रेलरमध्ये दिसत आहेत. सिक्वेलमध्येही प्रेक्षकांना आवडतील अशा गोष्टी आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फिर आयी हसीन दिलरुबाच्या ट्रेलरमध्ये काय?

रिशू सक्सेना कहा हैं? हा प्रश्न येतो आणि बॅकग्राऊंडला इक हसीना थी हे कर्ज सिनेमातलं गाणं वाजतं. पुन्हा एक दमदार लव्हस्टोरी आणि गूढ, रहस्य हे सगळं घेऊन हा सिनेमा आला आहे. कनिका धिल्लो यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. “जो पागलपन की हदसे ना गुजरे वो प्यार ही क्या? क्यूँ की होश मे तो रिश्ते निभाये जाते हैं.” असा संवाद राणीच्या म्हणजेच तापसी पन्नूच्या तोंडी आहे. त्यानंतर आणखी एक कलाकार ट्रेलरमध्ये दिसतो आहे. ज्याचं नाव आहे जिमी शेरगील. तो कोणत्या भूमिकेत आहे हे पण Phir Aayi Hasseen Dillruba च्या ट्रेलरमध्ये कळतं. पहिला सिनेमा पाहिला असेल तरच सिक्वेल कळू शकणार आहे. अर्थातच आदित्य श्रीवास्तवही यात आहेच. काय काय घडतं? आधीच्या घटनेचं काय कनेक्शन आहे? असं सगळंच या सिनेमात आहे. ट्रेलर तरी हेच सांगतो आहे. ट्रेलरने उत्कंठा निर्माण केली आहे. ९ ऑगस्टला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलिज होतो आहे.

हे पण वाचा- हसीन दिलरुबा! म्हणत पोस्ट केलेले प्राजक्ता माळीचे फोटो चर्चेत, चाहते म्हणाले ‘हॉटनेस ओव्हरलोडेड’

फिर आयी हसीन दिलरुबा ट्रेलर : तापसी पन्नू आणि विक्रांत मॅसी यांच्या ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ या रहस्यमय चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, सनी कौशलच्या एंट्रीने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.

तीन वर्षांनी येतो आहे सिक्वेल

तीन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटाचा सिक्वेल तयार झाला करण्यात आला आहे. आता हा लवकरच ओटीटी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तापसी पन्नूसोबत विक्रांत मेस्सी, जिमी शेरगिल आणि सनी कौशल चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचा ट्रेलर आजच रिलीज झाला आहे. फिर आयी हसीन दिलरुबा ( Phir Aayi Hasseen Dillruba ) चित्रपट ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर (Netflix) ९ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या सिनेमाची लिंक

दिलरुबा अर्थात राणी जिने पहिल्यांदा आपल्या नवऱ्याला फसवलं आणि नंतर त्याला वाचवण्यासाठी अशी कथा रचली की, तिला पकडण्यात पोलीसही अपयशी ठरले. पण, पोलिसांनी या प्रकरणातून अद्यापही हार मानलेली नाही. यावेळी जिमी शेरगिलने राणीला पकडण्याची जबाबदारी घेतली आहे. ‘फिर आयी हसीन दिलरुबा’चा ( Phir Aayi Hasseen Dillruba ) अप्रतिम ट्रेलर रिलीज करत निर्मात्यांनी म्हटलं आहे की, यावेळी चित्रपटाची कथा आणखी सस्पेन्स आणि ट्विस्टने भरलेली असेल. तापसी पन्नू आणि विक्रांच मेस्सी त्याच भूमिकेत दिसणार आहेत, पण यावेळी विकी कौशलचा भाऊ सनी कौशलने हर्षवर्धन राणेची जागा घेतली आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Phir aayi haseen dilruba tapsee pannu vikrant massy jimmy shergil film will relese on august 9 scj