Phir Aayi Hasseen Dillruba Movie Review: तापसी पन्नू व विक्रांत मॅस्सीचा सुपरहिट चित्रपट ‘हसीन दिलरुबा’चा दुसरा भाग तीन वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ हा चित्रपट ९ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात तापसी, विक्रांत अन् पोलीस अधिकारी वगळता बाकीचे सर्व कलाकार नवीन आहेत. हा चित्रपट कसा आहे ते जाणून घेऊयात.

‘हसीन दिलरुबा’मध्ये आपण पाहिलं की रानीचं (तापसी पन्नू) ज्वालापूरमध्ये सरकारी नोकरी करणाऱ्या रिशूशी (विक्रांत मॅस्सी) अरेंज मॅरेज होतं. रिशू खूप साधा असतो, तर रानी एकदम बोल्ड व बिंदास्त असते, त्यामुळे तिला रिशू फारसा आवडत नसतो. याचदरम्यान त्यांच्या घरी नील (हर्षवर्धन) नावाचा एक पाहुणा येतो. नील व रानी एकमेकांच्या प्रेमात पडतात. रिशूला बायकोच्या अफेअरबद्दल कळतं आणि तो विचित्र वागू लागतो. साधाभोळा असलेला रिशू अचानक हिंस्त्र होतो, रानीला मारण्यासाठी तो वेगवेगळे प्रयत्न करतो व स्वतःचा जीव घेण्याचाही प्रयत्न करतो. याच दरम्यान तापसीला तिच्या केलेल्या चुकीची जाणीव होते व ती रिशूच्या प्रेमात पडते. यानंतरही नील त्यांच्या आयुष्यातून जात नाही मग ते दोघे मिळून नीलचा खून करतात. मृतदेह नीलचा नसून रिशूचा आहे हे भासवण्यासाठी रिशू स्वतःचा हातही कापतो. पोलीस मृतदेह रिशूचा समजून नीलचा शोध घेतात पण तो सापडत नाही. तापसीही बराच काळ चाललेल्या पोलीस चौकशीनंतर सुटते व नंतर रिशू व रानी ज्वालापूर सोडून देतात.

What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
Ramesh Deo
मुंबईतील ‘या’ रस्त्याला दिले दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे नाव; अजिंक्य देव भावना व्यक्त करत म्हणाले, “त्यांनाही निश्चितच आनंद…”
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
Akshay Kumar
“स्टंट पाहून दिग्दर्शक घाबरून पळून गेले…”, अक्षय कुमारने सांगितला २७ वर्षे जुन्या चित्रपटाचा रंजक किस्सा
Dhananjay Munde on Anjali Damania
Dhananjay Munde : अंजली दमानियांनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर काय ठरलं? धनंजय मुंडे म्हणाले…
loksatta readers reaction on chaturang articles
पडसाद : बुरसटलेपण कधी कमी होणार?

“ती माझी मुलगी नाही,” ऐश्वर्या रायबद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर जया बच्चन यांनी केलेलं वक्तव्य

‘फिर आयी हसीन दिलरुबा’मध्ये आग्रा शहरात रिशू व रानीची प्रेम कहाणी दाखवण्यात आली आहे. इथे रानी भाड्याने राहते व एका ब्यूटी पार्लरमध्ये काम करते. तर रिशू नाव बदलून एका कोचिंग क्लासमध्ये शिकवत असतो. दोघेही पैसे कमवून थायलंडला निघून जाण्याची तयारी करत असतात. तर अभिमन्यू (सनी कौशल) कंपाउंडर असतो, जो रानीला पाहताच तिच्या प्रेमात पडतो. रानी व रिशू बाजारात असतात, रानीची बॅग चोरी होते आणि या चित्रपटात पुन्हा एकदा इन्स्पेक्टर किशोर रावतची (आदित्य श्रीवास्तव) एंट्री होते. त्यांनतर मोंटू चाचा (जिमी शेरगील) रानी व रिशूच्या आयुष्यात येतात, यानंतर रिशू रानीचा थायलंडचा प्लॅन फिस्कटतो आणि वेगळ्याच समस्या येऊ लागतात.

‘फिर आयी हसीन दिलरुबा’चा ट्रेलर

रिशू पोलिसांपासून कसं वाचायचं, याबद्दल विचार करत असतो तर रानी त्यासाठी भलतीच शक्कल लढवते. त्यानंतर रिशू, रानीच्या आयुष्यात अभिमन्यू येतो. मग रिशू, रानी व अभिमन्यू या तिघांच्या आयुष्यात साप शिडीची खेळ रंगतो. या खेळानंतरही रिशू, राणीची प्रेम कहाणी पूर्ण होते की नाही ते पाहण्यासाठी तुम्हाला सिनेमा बघावा लागेल.

खरं तर ‘हसीन दिलरुबा’मधील सस्पेन्स पाहून जे लोक ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ हा चित्रपट पाहणार असतील त्यांच्यासाठी हा भ्रमनिरास आहे. या चित्रपटातील मोठ्या त्रुटी म्हणजे चित्रपट खूप वेगाने पुढे सरकतो आणि दुसरा म्हणजे यात रिशू, रानी, अभिमन्यू पुढे काय करणार याचा अंदाज चित्रपट पाहताना सहज बांधता येतो. एकीकडे रिशूला शोधण्यासाठी पोलीस बंदोबस्त असतो, तर दुसरीकडे तोच रिशू बाजारात मोकळा फिरतो. रिशू-रानीच्या आयुष्यात पोलिसांचं अचानक येणं, नीलच्या हत्येचा पुन्हा एकदा तपास याच दरम्यान अभिमन्यूची एंट्री, नंतर होणारे खून व पोलिसांना चकवा देण्याचे प्रकार एका लिमिटनंतर स्क्रीनवर बघायला कंटाळवाणे वाटतात. कधी रिशू पळतोय, कधी रानी पळतेय, तर कधी पोलीस या दोघांच्या मागे पळतायत.

Phir Aayi Hasseen Dillruba Review
फिर आयी हसीन दिलरुबाचे पोस्टर (फोटो – तापसी पन्नू इन्स्टाग्राम)

चित्रपटात तापसी, विक्रांत, सनी व जिमी शेरगीला यांचा अभिनय ही जमेची बाजू आहे. पहिल्या भागाच्या तुलनेत दुसऱ्या भागात विक्रांतचा स्क्रीन टाइम जास्त नाही, तो फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पळताना दिसतो. सनीने त्याच्या भूमिकेला पुरेपूर न्याय दिला आहे. त्याच्या पात्राचा सस्पेन्स तो आपल्या अभिनयाने टिकवून ठेवतो.

Maharaj Review : वादात अडकलेला ‘महाराज’ कसा आहे? आमिर खानच्या मुलाचा पदार्पणाचा चित्रपट पाहावा की नाही? वाचा

ट्रेलर पाहताना जे डायलॉग दमदार वाटले होते ते प्रत्यक्षात चित्रपट पाहताना वाटत नाहीत. शिवाय चित्रपटात वारंवर दिनेश पंडितजींचा उल्लेख असहनीय आहे. दिग्दर्शक जयप्रद देसाई व लेखिका कनिका ढिल्लों यांनी चित्रपटाच्या कथेवर फारशी मेहनतच घेतलेली नाही. चित्रपटात जिथे काहीच ट्विस्ट नाहीत असं वाटतं तिथे ते दिनेश पंडित यांच्या नावाने नवीन काहीतरी आणतात आणि चित्रपट पुढे नेतात. पहिला चित्रपट पाहिल्याने पुढे काय घडतं, यासाठी हा सिनेमा तुम्ही पाहू शकता. पण यात ‘हसीन दिलरुबा’प्रमाणे रोमान्स, दमदार कथा यातलं काहीही पाहायला मिळणार नाही. अर्थात यात सस्पेन्स आहे, जो नंतर रटाळवाणा वाटतो.

Story img Loader