प्लॅनेट मराठी या ओटीटी विश्वातील पहिलं मराठी प्लॅटफॉर्म आजपासून एक नवीन वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. प्लॅनेट मराठीवरच्या ‘रानबाजार’, ‘अनुराधा’ यांसारख्या वेब सीरिजनंतर ‘बेबी ऑन बोर्ड’ (Baby on board) या वेबसीरिजचे दोन भाग प्रदर्शित झाले आहेत. ‘बेबी ऑन बोर्ड’च्या ट्रेलरनंतर प्रेक्षकांची या सीरिजविषयीची उत्सुकता अधिकच वाढली. प्रेक्षकांच्या या उत्सुकतेला पूर्णविराम देत ‘बेबी ऑन बोर्ड’ चे २ एपिसोड्स प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाले आहेत.

‘बेबी ऑन बोर्ड’च्या पहिल्या दोन एपिसोड्समध्ये प्रतीक्षा मुणगेकर म्हणजेच श्रुती व अभिजीत आमकार म्हणजेच सिद्धार्थचा त्यांच्या नव्या घरात गृहप्रवेश पाहायला मिळत आहे. गृहप्रवेश करतानाचा या जोडप्याचा आनंद, उत्सुकता यात दिसतोय. श्रुतीचे बाळंतपण सिद्धार्थने करायचे ठरवल्यावर आता एक बाबा आणि नवरा म्हणून त्याची जबाबदारी तो कशी पार पाडतो, या दरम्यान या दोघांमध्ये होणारी नोकझोक यात अधिकच रंगत आणत असल्याचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : बाळाच्या आईची काळजी घेताना बाबाची होणार दमछाक, ‘बेबी ऑन बोर्ड’ वेब सीरिजचा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का?

Mother Always Protect Her Child
आई आहे ना…! वेगात येणारी राईड पाहून चिमुकलीने काढला पळ अन् पाहा VIDEO चा जबरदस्त शेवट
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
prince narula yuvika chaudhary lohri celebration with daughter
सोशल मीडियावरील मतभेदानंतर ‘बिग बॉस’ फेम जोडपे प्रथमच दिसले एकत्र; लेकीसह साजरी केली लोहरी, फोटो आले समोर
Viral Video Shows Father And Daughter love
‘काय ते छोटे छोटे घास, काय ते तोंड पुसणे…’ एकाच ताटात बाबांबरोबर जेवणारी लेक; पहिला घास लेकीला, तर दुसरा… VIDEO व्हायरल
Mother love shocking video woman Went To Buy Milk for her baby And The Train Started Emotional Video
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
Pandit Vishnu Rajoria on 4 Children
Video: ‘चार मुलांना जन्म द्या, एक लाख रुपये मिळवा’, ब्राह्मण जोडप्यांसाठी परशुराम मंडळाच्या अध्यक्षांची ऑफर
mother shouts at the Pet Dog
आई अशीच ओरडते ना? घरभर केस पडलेले पाहून श्वानाला ओरडली अन्… ; VIDEO पाहून येईल हसू

श्रुतीचे डोहाळे पुरवण्यापासून तिच्या प्रेग्नंन्सी डाएटपासून खाण्या – पिण्याच्या वेळेची काळजी सिद्धार्थ घेत आहे. स्वतः चमचमीत, चाविष्ट पदार्थांचा त्याग करणारा, श्रुतीला मॉर्निंग वॉकला घेऊन जाणारा एक उत्तम नवरा आणि ‘डॅड टू बी’ सिद्धार्थ सर्वांनाच आवडताना दिसत आहे. या पहिल्या दोन एपिसोड्सने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता या सिरीजमध्ये पुढे काय घडणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.

आणखी वाचा : “आता फक्त धुराळा…” प्रवीण तरडेंचा व्यायाम करतानाचा व्हिडीओ पाहिलात का?

प्लॅनेट मराठी ओरिजनल्स, फिल्मी आऊल स्टुडिओज प्रस्तुत ‘बेबी ऑन बोर्ड’ या सीरिजचे दिग्दर्शन सागर केसरकर यांनी केले आहे. तर याचे निर्माते साईनाथ राजाध्यक्ष व बिना राजाध्यक्ष हे आहेत. त्याबरोबर अंकित शिंदे व दिव्या घाग हे कार्यकारी निर्माते आहेत.

Story img Loader