करोना काळामध्ये लोकांना ओटीटी माध्यमांची सवय लागली होती. या दरम्यान मराठी भाषिक प्रेक्षकांसाठी अक्षय बर्दापूरकर यांनी प्लॅनेट मराठी हे पहिले-वहिले मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म सुरु केले. या निर्मिती संस्थेने आतापर्यंत अनेक चांगल्या कलाकृती तयार केल्या आहेत. प्लॅनेट मराठीवरच्या ‘रानबाजार’, ‘अनुराधा’ यांसारख्या वेब सीरिजना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या माध्यमावरील आणखी एक नवी सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्लॅनेट मराठीच्या या नव्याकोऱ्या सीरिजचे नाव ‘बेबी ऑन बोर्ड’ (Baby on board) असे आहे. नुकतेच या सीरिजचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. प्रतिक्षा मुणगेकर आणि अभिजीत आमकर हे कलाकार या सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. पोस्टरवरुन हा सीरिज नव्याने विवाह झालेल्या जोडप्याच्या आयुष्यावर आधारलेली आहे असा अंदाज येत आहे. सागर केसरकर यांनी या सीरिजचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. साईनाथ राजाध्यक्ष व बिना राजाध्यक्ष हे या सीरिजचे निर्माते आहेत.

Emergency Movie News What Bombay HC Said?
Emergency : कंगना रणौत यांच्या इमर्जन्सी चित्रपटाचं काय होणार? “CBFC ने २५ सप्टेंबरपर्यंत…”, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
4th admission round of B.Sc Nursing course starts from 17th September
बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या चौथ्या प्रवेश फेरीला १७ सप्टेंबरपासून सुरुवात
emergency movie release postponed kangana ranaut
कंगना रणौत यांनी ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली; म्हणाल्या, “सेन्सॉर बोर्डाच्या…”
Pune Metro passenger service
पुणे: गणेशोत्सवानिमित्त मेट्रो प्रवासी सेवेच्या वेळेत वाढ, मध्यरात्री पर्यंत प्रवासी सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय
Following Bajaj Housing Fin NBFC IPO
‘बजाज हाऊसिंग फिन’पाठोपाठ अन्य ‘एनबीएफसी’ही सूचिबद्धतेचा मार्ग अनुसरणार!
Budha and surya rashi parivartan 2024 Budhaditya rajyog
३६ दिवस बक्कळ पैसा; कन्या राशीतील ‘बुधादित्य राजयोग’ ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना करणार मालामाल
India likely to see heavy rainfall in September
“असना” वादळामुळे सप्टेंबर महिना अतिवृष्टीचा..!

आणखी वाचा – Video: “मला वाईट वाटतंय आणि तू…”, किरण मानेच्या वागण्याने विकासला राग अनावर; मैत्रीत पडणार फुट

लग्न झाल्यानंतर जोडप्याला ‘चला तर मग गोड बातमी कधी..’ असा प्रश्न विचारला जातो. पहिल्या बाळाच्या वेळी प्रत्येकाच्या मनामध्ये भीती, उत्सुकता आणि आनंद अशा अनेक भावना एकाच वेळी असतात. बाळाची पहिली चाहूल ते त्याच्या जन्मापर्यंतचा हा प्रवास प्रत्येक जोडप्याला हवाहवासा असतो. अशाच एका लग्न झालेल्या जोडप्याच्या नऊ महिन्यांच्या प्रवासाची गोष्ट या सीरिजमध्ये मांडण्यात आली आहे. ही सीरिज २१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा – “भीमराया…”, लंडनमधील आंबेडकरांच्या निवासस्थानाचा फोटो पोस्ट करत गौरव मोरेने शेअर केली खास पोस्ट

पोस्टर प्रदर्शनाच्या वेळी प्लॅनेट मराठीचे प्रमुख अक्षय बर्दापूरकर यांनी ‘बेबी ऑन बॉर्ड’च्या माध्यमातून एक नवा विचार असलेली सीरिज आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत. आम्हाला या प्रवासामध्ये उत्तम दिग्दर्शक आणि कलाकारांची साथ मिळाली. आजच्या पिढीतील तरुणांना आवडेल किंवा आपली वाटेल अशा प्रकारचा आशय या सीरिजमध्ये आहे. लग्नानंतर बाळाच्या येण्याने दोन जोडीदार पुन्हा एकदा कसे जवळ येतात हे सुद्धा बेबी ऑन बॉर्डमध्ये पाहायला मिळेल. ही हलकी फुलकी सीरिज प्रेक्षकांना नक्की आवडेल अशी आशा आहे असे म्हटले.