सई ताम्हणकर सध्या मराठी सिनेसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री आहे. बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री अशी ओळख असणाऱ्या सईने अभिनयाच्या बळावर नाव कमावले आहे. तिने मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. आमिर खानच्या ‘गजनी’ चित्रपटामध्ये ती झळकली होती. ‘मिमी’ या चित्रपटामध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. तिच्या कामाचे सर्वांनी कौतुक केले होते. तिला या चित्रपटासाठी अनेक पुरस्कारदेखील मिळाले आहेत. चित्रपट, मालिकांसह तिने काही वेब सीरिजमध्येही काम केले आहे.

सई सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. या माध्यमाद्वारे ती चाहत्यांशी संवाद साधत असते. गेल्या काही दिवसांपासून सई इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या ‘इंडिया लॉकडाऊन’ या आगामी चित्रपटाबद्दलचे अपडेट्स देत आहे. नुकतेच तिने या चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर केले. या पोस्टरद्वारे तिचा या सीरिजमधला नवा लूक समोर आला आहे.

middle class family
“६० लाख उत्पन्न असलेलाही गरीबच”, सोशल मीडियावर वाद; तुमचं मत काय?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Petrol And Diesel Price on 3 february 2025
Petrol Diesel Price : सर्वसामान्यांना मिळणार दिलासा! आज महाराष्ट्रात कमी झाले पेट्रोल-डिझेलचे दर
sai tamhankar
सई ताम्हणकर लवकरच देणार खास सरप्राईज; पोस्ट शेअर करीत म्हणाली, “३ तारखेला…”
share market latest news in marathi
Market roundup : शेअर बाजारात बजेटपूर्व जबरदस्त आशावाद; सेन्सेक्स ७४१ अंशांच्या मुसंडीने ७७,५०० वर
a place in maharashtra showcasing on a 20 rupees
Video : २० रुपयांच्या नोटेवर आहे महाराष्ट्रातील या लोकप्रिय ठिकाणाचे चित्र; तरुणाचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
Rupee biggest fall in two weeks print eco news
रुपयाची दोन आठवड्यांतील सर्वात मोठी आपटी
Rupee Weakest Currency in Southeast Asia
Moody’s on Rupee : रुपया आग्नेय आशियातील सर्वात कमकुवत चलन : मूडीज

आणखी वाचा – ‘मिर्झापूर’ फेम अभिनेत्याने सुनील शेंडे यांना वाहिली श्रद्धांजली; पोस्ट शेअर करत म्हणाले…

‘इंडिया लॉकडाऊन’ चित्रपटामध्ये सई ताम्हणकरने साकारलेल्या पात्राचे नाव ‘फूलमती’ असे आहे. पोस्टरमध्ये हे नाव मोठ्या अक्षरांमध्ये लिहिले आहे. एखाद्या सामान्य घरातल्या मध्यमवर्गीय बाईप्रमाणे तिचा लूक आहे. साधी साडी, गळ्यात मंगळसुत्र आणि कपाळावर कुंकू असा अवतार तिने केला आहे. तिच्या फोटोमागे भारताचा नकाशा पाहायला मिळतो. टाळेबंदी दाखवण्यासाठी साखळ्या आणि टाळ्याचा वापर पोस्टरमध्ये करण्यात आला आहे.

आणखी वाचा – “बाजीराव पेशवे छत्रपतींची गादी बळकावू शकले असते पण…” शरद पोंक्षेंनी करून दिली इतिहासाची आठवण

या पोस्टरला सईने “त्यांच्यासमोर खूप अडचणी येत होत्या. जीवन जगण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत होता आणि या महामारीमुळे त्याच्या त्रासात भर पडली”, असे कॅप्शन दिले आहे. मधुर भांडारकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सई व्यतिरिक्त प्रतीक बब्बर, श्वेता बासु प्रसाद, आहाना कुमरा आणि प्रकाश बेलवाडी या कलाकारांनी काम केले आहे. हा चित्रपट २ डिसेंबर रोजी झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader