बॉलीवूड अभिनेत्री आणि प्रसिद्ध युट्यूबर प्राजक्ता कोळीने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. प्राजक्ता गेल्या अनेक वर्षांपासून वृशांक खनालबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. रविवारी सकाळी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने साखरपुड्याची घोषणा केली. बॉयफ्रेंड वृशांकसह गुपचूप साखरपुडा उरकत प्राजक्ताने तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

हेही वाचा : “तुझ्या मामूवर एक उपकार कर”, सलमान खानची भाचीसाठी भावनिक पोस्ट, बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाला…

प्राजक्ताने हातातील अंगठीचा खास फोटो शेअर करत साखरपुड्याची घोषणा केली. “वृशांक आजपासून माझा एक्स बॉयफ्रेंड आहे” असं अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोवर आता बॉलीवूडसह, सोशल मीडिया स्टार्स शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

हेही वाचा : “खुपते तिथे गुप्ते १६ भागांमध्येच संपत आहे कारण…”, अवधूत गुप्तेने केला खुलासा

प्राजक्ता आणि वृशांक कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. वृशांक हा व्यवसायाने वकील असून प्राजक्ताच्या करिअरच्या सुरुवातीपासून त्याने तिला खंबीरपणे साथ दिल्याचं पाहायला मिळालं आहे. अभिनेत्रीच्या आई-वडिलांसह वृशांकचं खूप सुंदर बॉन्डिंग असल्याचं त्यांच्या व्हिडीओमधून पाहायला मिळतं. वृशांक मूळचा नेपाळचा असून गेली अनेक वर्ष तो कामानिमित्त मुंबईत राहत आहे. वृशांक आणि प्राजक्ताने नेपाळमधील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हेही वाचा : झी मराठी वाहिनीचा खास सोहळा ‘उत्सव नात्यांचा, जल्लोष गणरायाचा’

दरम्यान, अभिनेत्री प्राजक्ता कोळी मिसमॅच्ड या सीरिजमुळे प्रसिद्धीझोतात आली. अनिल कपूर, वरुण धवन, नीतू कपूर आणि कियारा अडवाणी यांच्याबरोबर तिने ‘जुग जुग जीयो’ या चित्रपटात सुद्धा काम केलं आहे. ती शेवटची विद्या बालन प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘नीयत’ चित्रपटात दिसली होती. आता प्राजक्ता कोळी लवकरच लेखिका म्हणून पदार्पण करणार आहे. त्यापूर्वीच तिने साखरपुड्याची घोषणा करत चाहत्यांना सुखद वार्ता दिली आहे.

Story img Loader