प्राजक्ता माळी लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतील मेघना या पात्राने प्राजक्ताला लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नखरेल अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या प्राजक्ताने नुकतंच प्लॅनेट मराठीच्या ‘पटलं तर घ्या’ कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या मुलाखतीतील प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तर देऊन प्राजक्ताने कार्यक्रमाला रंगत आणली. प्राजक्ताने या मुलाखतीत वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यातील अनेक प्रसंग, किस्से सांगितले. मालिकांप्रमाणेच चित्रपटांतही काम करुन प्राजक्ताने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. प्राजक्ताने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानबरोबरही स्क्रीन शेअर केली आहे. याचा किस्साही प्राजक्ताने या मुलाखतीत सांगितला.

हेही वाचा>> Video: पती आदिल खानला तुरुंगात टाकल्यानंतर राखी सावंत शुटिंगमध्ये व्यग्र, म्हणाली “जीना यहाँ…”

प्राजक्ताने ‘स्वदेश’ या चित्रपटात काम केलं आहे. या चित्रपटातील एका सीनचा किस्सा तिने मुलाखतीत शेअर केला. प्राजक्ता म्हणाली, “स्वदेश चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी मी आठवी-नववीत होते. या चित्रपटातील नायिका लायब्ररीत पैसे विसरते. ते पैसे देण्यासाठी शाहरुख तिच्या मागे जातो, असा सीन आहे. तो लायब्ररीतून बाहेर पडताना त्याला दोन मुली धडकतात. त्यापैकी एक मी आहे”. “मी तेव्हा फक्त तेरा वर्षांची होती. त्यामुळे शाहरुख खान समोर आल्यानंतर मी आपोआप बाजूला व्हायचे. त्यामुळे तो नायिकेपर्यंत सहज पोहोचायचा. शेवटी शाहरुखने मला पकडलं आणि मला म्हणाला, तुला फक्त उभं राहायचं आहे…बाकी काही करू नकोस. त्यानंतर मग १८व्या टेकमध्ये मी काहीच केलं नाही. आणि मग शाहरुखचं मला धडकला”, असंही प्राजक्ताने पुढे सांगितलं.

हेही वाचा>> Video: “मी कायमच त्याला पती मानलं, पण…” नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी कॅमेऱ्यासमोरच रडली, म्हणाली “पैशाने तू…”

प्राजक्ताने या किस्स्याबद्दल सांगताच कार्यक्रमात एकच हशा पिकला. या कार्यक्रमात प्राजक्तसाह अभिनेत्री ऋतुजा बागवेनेही हजेरी लावली होती. प्राजक्ता सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prajakta mali shared screen with shah rukh khan in swadesh film kak