बहुचर्चित व बहुप्रतीक्षित ‘मेड इन हेवन’ या वेब सीरिजचे दुसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. २०१९ मध्ये आलेल्या पहिल्या पर्वाने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले होते. पहिल्या पर्वाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर दुसरे पर्व ‘ॲमेझॉन प्राइम’वर १० ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. त्यातील एक एपिसोड सध्या चांगलाच चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंचपक्वांनांचं जेवण अन्…; मुग्धा वैशंपायनचं आजोळी थाटात केळवण संपन्न, फोटो शेअर करत म्हणाली…

पाचव्या एपिसोडमध्ये राधिका आप्टेने दलित मुलगी पल्लवीची भूमिका साकारली आहे. त्यामध्ये पल्लवीच्या लग्नाची गोष्ट दाखविण्यात आली आहे. हा एपिसोड पाहिल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट केले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एपिसोडमधील दोन फोटो शेअर केले आहेत.

स्मृती इराणींचं पतीच्या पहिल्या पत्नीबद्दल वक्तव्य; म्हणाल्या, “मोना माझ्यापेक्षा…”

फोटो पोस्ट करीत त्यांनी लिहिले, “पल्लवी या दलित स्त्रीपात्राचा दृढनिश्चय, तिनं उघडपणे केलेला विरोध व प्रतिकार या गोष्टी मला खूप आवडल्या. ज्या वंचित आणि बहुजनांनी या मालिकेचा हा भाग पाहिला आहे, त्यांना माझं असं सांगणं आहे की, त्यांनी त्यांचं व्यक्तिमत्त्व व ओळख यावर दृढ राहिलं पाहिजे. ते दृढ राहिले तरच त्याला राजकीय महत्त्व प्राप्त होऊ शकेल. कारण- पल्लवी म्हणते की, एकूणच सर्व काही राजकारणासाठी चाललंय.”

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या ट्विटर पोस्टवर एपिसोडचे दिग्दर्शक नीरज घायवान यांनी कमेंट केली आहे. “खूप खूप धन्यवाद सर. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे,” अशी कमेंट करीत त्यांनी आभार मानले.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar praised radhika apte character in made in heaven 2 hrc