प्रिया बापट सध्या तिच्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या तिसऱ्या सीझनमुळे चर्चेत आहे. ही वेब सीरिज महाराष्ट्राच्या राजकारणावर आधारित असून यामध्ये प्रिया बापटसह अतुल कुलकर्णी आणि सचिन पिळगावकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा तिसरा सीझन २६ मे रोजी प्रदर्शित होणार असून, यामध्ये अभिनेत्री प्रिया बापट ‘पौर्णिमा गायकवाड’ ही मुख्य भूमिका साकारणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : साखरपुड्यानंतर परिणीती चोप्रा मुंबईकडे रवाना, होणाऱ्या नवऱ्यासाठी खास पोस्ट करीत म्हणाली, “माझे ‘प्रेम’ इथे…”

प्रियाने अलीकडेच ‘पुणेरी आवाज’ या रेडिओ शोमध्ये हजेरी लावली होती. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’मध्ये ‘पौर्णिमा गायकवाड’ हे पात्र साकारताना अनुभव कसा होता याविषयी या रेडिओ शोमध्ये प्रियाने खुलासा केला आहे. प्रिया म्हणाली, “‘सिटी ऑफ ड्रीम्स’मधील ‘पौर्णिमा’च्या भूमिकेसाठी मी ऑडिशन दिली होती. ‘नागेश कुन्नूर’ यांच्यासोबत काम करण्याची माझी अनेक वर्षांपासून इच्छा होती. कोणत्याही भूमिकेची निवड करताना मी सातत्याने प्रयत्न करते की, माझ्या आधीच्या कामापेक्षा नवी भूमिका ही वेगळी असेल. ‘काकस्पर्श’पासून ते ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’पर्यंत… मी प्रत्येक वेळी वेगळ्या प्रकारच्या भूमिका करण्याला प्राधान्य दिले.”

हेही वाचा : ‘तारीख पे तारीख…’ सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘योद्धा’ला प्रदर्शनाचा मुहूर्त सापडेना, जाणून घ्या कारण

प्रियाने पुढे सांगितले, “‘पौर्णिमा गायकवाड’ ही भूमिका माझ्या मूळ स्वभावापेक्षा खूप वेगळी आहे. प्रत्येक गोष्टीत तिची रिअ‍ॅक्ट करण्याची पद्धत माझ्यापेक्षा फार वेगळी आहे. सुरुवातीला या सगळ्या गोष्टी आत्मसात करायला कठीण गेल्या, परंतु जेव्हा तुमच्याकडे उत्तम दिग्दर्शक आणि लिखाण असते, तेव्हा या गोष्टी अगदी सहज साध्य होतात. कारण लेखकाने लिहून दिलेले उत्तम लिखाण तुम्हाला दिग्दर्शकाच्या साथीने लोकांपर्यंत पोहोचवायचे असते. ‘पौर्णिमा गायकवाड’ हे पात्र साकारताना माझ्यासाठी दिग्दर्शक आणि लिखाण हे दोन भक्कम आधार होते. म्हणूनच मला काम करतानाही मजा आली. तसेच या पात्राने अभिनेत्री म्हणूनही अनेक गोष्टी शिकवल्या ज्या माझ्या कायम जवळ राहतील.”

हेही वाचा : ऑस्कर विजेत्या गुनीत मोंगांनी सांगितला ‘तो’ अनुभव, खंत व्यक्त करीत म्हणाल्या “सर्वांना ट्रॉफीबरोबर…”

दरम्यान, ‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा पहिला सीझन १३ मे २०१९ रोजी प्रदर्शित झाला होता, तर या वेब सीरिजचा दुसरा सिझन २९ जुलै २०२१ प्रदर्शित झाला होता. यानंतर आता येत्या २६ मे रोजी ‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा तिसरा सीझन ‘डिस्नी + हॉटस्टार’वर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.