प्रिया बापट ही मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. गेली अनेक वर्षं ती मालिका, नाटक, चित्रपट, वेब सिरीज अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मराठीनंतर हिंदी मनोरंजन सृष्टीतदेखील तिने तिची स्वतःची ओळख निर्माण केली आहे. प्रियाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. प्रिया सध्या तिच्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या सिरीजमुळे खूप चर्चेत आहे. या वेब सीरिजचा तिसरा सीझन नुकताच प्रदर्शित झाला असून यातील प्रियाच्या कामाची खूप प्रशंसा होत आहे.
चार वर्षांपूर्वी या वेब सीरिजचा पहिला सीझन प्रदर्शित झाला तेव्हा त्यातील प्रिया बापटच्या एका बोल्ड सीनमुळे कित्येकांच्या भुवया उंचावल्या होत्या. एका लेसबीयन कीसिंग सीनमुळे प्रियाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं गेलं होतं आणि त्या सीरिजमधील फक्त तो एक सीन सोशल मीडियावर खुपच व्हायरल झाला होता. लोकांच्या या मानसिकतेबद्दल आणि एकूणच सीरिजमधील या इंटीमेट सीन्सकडे प्रिया एक अभिनेत्री म्हणून कसं बघते यावार नुकतंच तिने भाष्य केलं आहे.
लोकसत्ताच्या ‘डिजिटल अड्डा’मध्ये या वेबसीरिजच्या संपूर्ण टीमने हजेरी लावली. त्यावेळी प्रियाने यासंदर्भात उत्तर दिलं. प्रिया म्हणाली, “त्यावेळी तो सीन अचानक व्हायरल झाल्याने मला एक दोन दिवस त्रास झाला, कारण मी ते काम म्हणून आणि गोष्टीची गरज म्हणून स्वीकारलं होतं. जसं आपण एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील वेगवेगळे टप्पे, छटा समजून घेतो तशाच त्या पात्राच्या आयुष्यातील त्या वेगवेगळ्या छटा तुम्ही समजून घेता, आणि ती गोष्ट तेवढ्यापुरतीच होती. त्या एका मुद्द्यावर संपूर्ण सीरिज बेतलेली नव्हती, आणि जरी तसं असतं तरी मला काहीच प्रॉब्लेम नव्हता.”
पुढे प्रिया म्हणाली, “मला असं वाटतं की लोकांनी वैयक्तिक आयुष्य आणि कलाकृती या दोन्ही गोष्टींकडे भिन्नपणे बघायला पाहिजे, जरी ही वेबसीरिज त्या पात्राच्या समलैंगिकतेबद्दल असती तरी मग तो या गोष्टीचा महत्त्वाचा भाग आहे या दृष्टीनेच त्याकडे बघायला पाहिजे. मी अभिनेत्री आहे, ते माझं काम आहे, मी ते करून बाहेर पडलेली असते पण लोक मात्र त्याबद्दल चर्वण करून त्याचं एक मोठं प्रकरण बनवतात. मला आता लोक काय म्हणतात याची अजिबात काळजी वाटत नाही. जेव्हा लोकांना माझं काम आवडेल, माझा परफॉर्मन्स आवडले तेव्हा लोक या गोष्टीही शांतपणे स्वीकारतात.”
‘सिटी ऑफ ड्रीम्स सीझन ३’ हा प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. यातील प्रिया बापटच्या कामाचं सगळेच कौतुक करत आहेत. प्रियासह या वेबसीरिजमध्ये अतुल कुलकर्णी, सचिन पिळगांवर, एजाज खान, सुशांत सिंगसारखे मातब्बर कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ही वेबसीरिज डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.