‘हेरा फेरी’, ‘हलचल’, ‘हंगामा’, ‘मालामाल विकली’ असे एकाहून एक सरस कॉमेडी चित्रपट देणारे दिग्दर्शक प्रियदर्शन गेले बरेच दिवस इंडस्ट्रीपासून लांब आहेत. गेल्याच महिन्यात प्रियदर्शन यांचा ‘करोना पेपर्स’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता, पण त्याला काही खास प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता तब्बल ३० दिवसांतच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करायचा निर्णय घेण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९४९ च्या एका जपानी चित्रपटावर हा बेतलेला असून करोनाच्या पार्श्वभूमीवर आधारीत या चित्रपटात एक थ्रिलरचा अनुभव मिळणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रियदर्शन यांनी तब्बल २ वर्षांनी मल्याळम चित्रपटसृष्टीत पुनरागमन केलं आहे. यामुळे हा चित्रपट खास ठरला आहे.

आणखी वाचा : Viral Video : ब्रा परिधान न केल्याने इव्हेंटदरम्यान ईशा गुप्ताची फजिती; नेटकरी म्हणाले, “ताई थोडी…”

आता हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ५ मे पासून बघायला मिळणार आहे. केवळ महिन्याभरातच हा चित्रपट ओटीटीवर येणार असल्याने बऱ्याच लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शेन निगम, शाइन टॉम चाको, सिद्दीकी, जीन लाल, गायत्री शंकर यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. डिज्नी प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyadarshan directed corona papers malyalam movie ott release date declared avn
Show comments