Psychological and Suspense Thrillers : ओटीटीवर घरबसल्या प्रेक्षक अनेक प्रकारच्या आशयाचा आस्वाद घेत असतात. ओटीटी प्लॅटफॉर्मवर कोणत्या आशयाचा सिनेमा ट्रेंड करतोय हे दिसते. त्यानुसार सस्पेन्स आणि सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट व मालिकांची क्रेझ प्रचंड वाढली आहे असे दिसते. ‘अंधाधून’ आणि ‘दृश्यम’ या सिनेमांना प्रेक्षकांनी ओटीटीवर चांगलीच पसंती दिली. हे चित्रपट सस्पेन्स आणि सायकॉलॉजिकल थ्रिलर जॉनरमधील आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विजय सेतुपतीचा ‘महाराजा’ हा चित्रपट प्रेक्षकांनी खूप मोठ्या प्रमाणात पसंत केला. ओटीटीवर स्ट्रीम होताच या चित्रपटाने विक्रमी यश मिळवले आणि अजूनही हा चित्रपट ट्रेंडमध्ये आहे. मात्र, नेटफ्लिक्सवर हा एकमेव सायकोलॉजिकल थ्रिलर नाही. आम्ही तुम्हाला ५ सर्वोत्तम सायकोलॉजिकल आणि सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांविषयी सांगणार आहोत.

हेही वाचा…ना ‘मिर्झापूर’ ना ‘पंचायत’…; जगभरातील लोकांनी Google वर ‘या’ भारतीय वेब सीरिजला सर्वाधिक केलं सर्च

लीव्ह द वर्ल्ड बिहाईंड

Leave the World Behind On Netflix : २०२३ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट रुमान आलम यांच्या २०२० मधील प्रसिद्ध कादंबरीवर आधारित आहे. चित्रपटात एका भाड्याच्या घरात राहणाऱ्या कुटुंबाची कथा आहे. या कुटुंबाच्या घरी एक सायबर अटॅक होतो आणि त्यानंतर कथा अनपेक्षित वळण घेते. या कथेत भरपूर थ्रिल आणि सस्पेन्स पाहायला मिळतो.

‘द ट्रिप’

The Trip On Netflix : ‘द ट्रिप’ या चित्रपटाची कथा एका जोडप्याभोवती फिरते. जे जोडपे आपल्या घरात वीकेंड साजरा करीत असताना एकमेकांचा खून करण्याचा गेम खेळतात. या गेममध्ये कोण जिंकतो आणि कोण हरतो, हे चित्रपट पाहिल्यावरच समजते. मात्र, त्यातील ट्विस्ट आणि टर्न प्रेक्षकांना चकित करतात.

हेही वाचा…अनपेक्षित कल्पना आणि खिळवून ठेवण्याऱ्या कथा, OTT वरील घोटाळ्यांवर आधारित ‘हे’ चित्रपट पाहिलेत का?

‘द डिक्लाइन’

The Decline On Netflix : हा चित्रपट एक सस्पेन्स थ्रिलर आहे, यामध्ये एक ट्रेनर, त्याची पत्नी आणि मुलगी बर्फाच्छादित पर्वतांमध्ये लोकांना प्रशिक्षण देत असतात. एका अनपेक्षित घटनेमुळे संपूर्ण कथा रंजक वळण घेते.

होल्ड द डार्क’

Hold The Dark On Netflix : ही एक अॅक्शन-थ्रिलर फिल्म आहे, ज्याची कथा हिंसक लांडग्यांभोवती फिरते. जे लांडगे अनेक मुलांचा जीव घेतात. या लांडग्यांचा शोध घेण्यासाठी एका हरवलेल्या मुलाची आई आणि तिचा इराक युद्धातून परतलेला नवरा प्रयत्न करत असतात. चित्रपट अनेक सस्पेन्सफुल वळणांनी भरलेला आहे.

हेही वाचा…जयदीप अहलावतच्या ‘पाताल लोक’ सीरिजच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा, चाहते म्हणाले, “हथोडा त्यागी…”

कॅलिबर

Calibre On Netflix : हा सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे, जो दोन मित्रांची कथा सांगतो. हे मित्र शिकार करण्यासाठी एका ठिकाणी जातात. मात्र, चुकून एका हरणाऐवजी ते एका मुलाला ठार मारतात. या घटनेनंतर कथा थरारक ट्विस्ट आणि टर्न घेत पुढे सरकते.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Psychological and suspense thrillers on ott netflix leave the world behind the trip the decline hold the dark psg