थिएटर्समध्ये व ओटीटीवर दर आठवड्याला बरेच चित्रपट रिलीज होतात. थिएटर्सवरील चित्रपटांना ज्या प्रमाणे प्रेक्षकांचं प्रेम मिळतं, त्याचप्रमाणे ओटीटीवरही आता चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. ओटीटीवर जगभरातील कंटेंट आपल्याला घरबसल्या पाहता येतो. असाच एक भयपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हा चित्रपट पाहून तुम्ही भीतीने हादरून जाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मे २०२४ मध्ये, एक इंडोनेशियन सायकोलॉजिकल हॉरर चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट रिलीज झाल्यावर त्याची बरीच चर्चा झाली होती. हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जोको अन्वर यांनी केले असून चित्रपटाची कथाही त्यांनीच लिहिली आहे. या चित्रपटात फरादिना मुफ्ती, रजा रहाडियन, क्रिस्टीन हकीम आणि स्लेमेट राहार्डजो या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची प्रचंड चर्चा झाली होती. तसेच याला २०२४ मधील इंडोनेशियन चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटासह १७ नामांकने मिळाली होती. इतकी नामांकने मिळवणारा हा एकमेव चित्रपट ठरला होता. ग्रेव्ह टॉर्चर (Grave Torture) असं या चित्रपटाचं नाव आहे.

ग्रेव्ह टॉर्चर या सायकोलॉजिकल हॉरर थ्रिलर चित्रपटाची कथा काय आहे?

चित्रपटाची सुरुवात सीता आणि आदिल या भावंडांपासून होते. हे दोघेही एका छोट्या बेकरीमध्ये आपल्या आई-वडिलांसह राहतात. त्याचे आई- वडील एका आत्मघातकी बॉम्बस्फोटात मारले जातात. त्यांच्या निधनानंतर या दोन्ही भावंडांचे आयुष्य बदलून जाते. या घटनेनंतर, सीता आणि आदिल यांना बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले जाते. तिथे ते त्यांच्या पालकांच्या निधनाच्या दुःखातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. यानंतर सीता एक निर्णय घेते, पण ती ज्या मार्गावर तिथून परतणं शक्य नसतं. तसेच तो प्रवासही खूप भीतीदायक असतो. तिच्या या धोकादायक प्रवासात काय होतं हे तुम्हाला चित्रपट पाहूनच कळेल.

ग्रेव्ह टॉर्चर IMDb रेटिंग

ग्रेव्ह टॉर्चर या सायकॉलॉजिकल हॉरर थ्रिलर चित्रपटाला IMDb वर ६.२ रेटिंग मिळाले आहे. तुम्हाला हा चित्रपट घरबसल्या पाहता येऊ शकतो. ग्रेव्ह टॉर्चर ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर (Grave Torture on Netflix) उपलब्ध आहे. तुम्हाला खूप भयंकर आणि हॉरर चित्रपट पाहण्याची आवड असेल तर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Psychological horror thriller grave movie grave torture on netflix hrc