Pushpa 2 Digital Rights : २०२४ मध्ये अनेक मोठ्या बजेटच्या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. प्रभासचा ‘सालार’, सूर्या आणि बॉबी देओल स्टारर ‘कंगुवा’ आणि हिंदीतील ‘सिंघम अगेन’ यांसारख्या चित्रपटांच्या यादीत अल्लू अर्जुनचा बहुचर्चित चित्रपट ‘पुष्पा २’ देखील आहे. या बहुचर्चित सिनेमाचा ट्रेलर १७ नोव्हेंबर २०२४ रोजी बिहारच्या पाटणामध्ये लॉन्च करण्यात आला. ट्रेलरमध्ये अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या पात्राची दमदार अ‍ॅक्शन पाहायला मिळाली होती. या चित्रपटात रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. प्री-बुकिंगमध्ये सिनेमाने चांगली कमाई केली असून आता या सिनेमाचे डिजिटल हक्कांची विक्री झाली असून त्याचेही आकडे समोर आले आहेत.

बहुतेक प्रेक्षक अनेकदा थिएटरमध्ये चित्रपट पाहू शकत नाहीत, त्यानंतर अशा प्रेक्षकांना ओटीटीवर चित्रपट पाहण्याची संधी मिळते. चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर काही दिवसांतच ओटीटीवर प्रदर्शित होतात. यामुळे चित्रपट निर्मात्यांना चांगलाच फायदा होतो, कारण चित्रपटाचे टेलिव्हिजन आणि ओटीटी राइट्स आधीच विकले जातात. यामधून निर्मात्यांना कोट्यवधींची रक्कम मिळते.

allu arjun pushpa 2 trailer release
Pushpa 2 : “श्रीवल्ली मेरी बायको…”, जबरदस्त डायलॉग अन् अल्लू अर्जुनचा हटके अंदाज; ‘पुष्पा २’चा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
raja hindustani budget and box office collection
फक्त ६ कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले ७६ कोटी, तुम्ही पाहिलाय का २८ वर्षांपूर्वीचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट?
sushant singh rajput prateik babbar
सुशांत सिंह राजपूतने प्रतीक बब्बरला सांगितलेली ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण, खुलासा करत म्हणाला…
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
stand up comedy in india
मनोरंजनाची तरुण परिभाषा
vicky kaushal in parshuram role
‘छावा’नंतर भगवान परशुरामाची भूमिका साकारणार विकी कौशल; सिनेमाचे पहिले पोस्टर आणि जबरदस्त लूक आला समोर
madhuri dixit tezaab is highest grossing film of 1988
आधीचे १० सिनेमे झाले फ्लॉप, ‘या’ एका चित्रपटामुळे माधुरी दीक्षित रातोरात झाली सुपरस्टार! शाहरुखशी आहे खास कनेक्शन

हेही वाचा…‘मिर्झापूर’पेक्षाही दमदार ‘या’ सीरिज प्राइम व्हिडीओवर आहेत उपलब्ध, तुम्ही पाहिल्यात का?

‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार ‘पुष्पा २’

सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘पुष्पा २’चे डिजिटल राइट्स नेटफ्लिक्सने तब्बल २७५ कोटींना खरेदी केले आहेत. त्यामुळे हा सिनेमा नेटफ्लिक्सवर पाहण्याची संधी मिळणार आहे. मात्र, याबाबत निर्मात्यांनी अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.

‘पुष्पा २’ने ‘पठाण’ आणि ‘टायगर ३’ टाकले मागे

‘ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ’ने ‘टायगर ३’चे ओटीटी तब्बल २०० कोटींना विकत घेतले होते. तर, ‘पठाण’चे ओटीटी राइट्स १०० कोटींना विकत घेतले होते. तर या चित्रपटांच्या दुप्पट किमतीने ‘पुष्पा २’चे ओटीटी अधिकार विकले गेले आहेत. त्यामुळे प्रदर्शनाआधीच ‘पुष्पा २’ने या चित्रपटांना मागे टाकलं आहे.

हेही वाचा…भर कार्यक्रमात दीपिका पादुकोणच्या डिप्रेशन अन् मातृत्वावर केला विनोद; नेटकऱ्यांनी सुनावल्यावर कॉमेडियन म्हणाला, “माझ्या कमेंट…”

टेलिव्हिजन राइट्सची देखील विक्री

‘पुष्पा २’चे टेलिव्हिजन राइट्स देखील आधीच विकले गेले आहेत. ‘इंडिया टुडे’च्या अहवालानुसार, पेन स्टुडिओजचे जयंतीलाल गाडा यांनी सांगितले की, ‘पुष्पा २’ ही भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. जगभरात पेन स्टुडिओजने या चित्रपटाचे टेलिव्हिजन राइट्स खरेदी केले आहेत.

पहिल्या भागाच ब्लॉकबस्टर यश

‘पुष्पा’च्या पहिल्या भागाने २०२१ मध्ये प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळवले. करोना काळातही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम प्रस्थापित केले होते. या अ‍ॅक्शन-ड्रामा चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले होते, आणि याही भागात तेच दिग्दर्शन करणार आहेत.

हेही वाचा…अमृता खानविलकर-अमेय वाघचा ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपट OTT वर प्रदर्शित

‘पुष्पा २’ रिलीज डेट आणि प्री-बुकिंग

‘पुष्पा २’ हा चित्रपट ५ डिसेंबर २०२४ रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे याच्या युएसएमधील प्री-बुकिंगला सुरुवात झाली आहे. या सीक्वलमध्ये फहाद फासिल आणि अल्लू अर्जुन यांची जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे, ज्यामुळे हा चित्रपट आणखी रोमांचक ठरणार आहे.

हेही वाचा…या वीकेंडला ओटीटीवर पाहा थिएटरमध्ये गाजलेला ‘हा’ सिनेमा; सोबतीला आहे ऐतिहासिक वेब सीरिजसह थ्रिलरची मेजवानी

‘पुष्पा २’ने आधीच ओटीटी आणि टेलिव्हिजन राइट्समधून मोठ्या प्रमाणात आर्थिक यश मिळवले आहे. आता थिएटर रिलीजनंतर हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.