Pushpa 2 The Rule OTT Release Update: सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा 2’ हा चित्रपट अखेर सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. तीन वर्षांपूर्वी ‘पुष्पा: द राईज’ने बॉक्स ऑफिस गाजवलं होतं. त्यानंतर निर्मात्यांनी दुसऱ्या भागाची घोषणा केली होती. अखेर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आज सगळीकडे ‘पुष्पा 2’ ची क्रेझ पाहायला मिळत आहे. काहींना अल्लू अर्जुन व रश्मिकाची केमिस्ट्री आवडली आहे, तर काहींना मल्याळम स्टार फहाद फाझीलच्या एंट्रीने वेड लावलं आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचे शो पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल झाले असून अनेकांना तिकीटही मिळत नाहीयेत.
हेही वाचा – Pushpa 2 च्या निर्मात्यांना मोठा धक्का; ‘या’ प्लॅटफॉर्म्सवर ऑनलाइन लीक झाला चित्रपट
आज (५ डिसेंबरला) हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्याच्या ओटीटी रिलीजबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. हा चित्रपट लवकरच तुम्हाला घरबसल्या पाहता येईल. ‘पुष्पा 2: द रूल’ केव्हा व कोणत्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल, त्याबद्दल जाणून घेऊयात.
कोणत्या प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार ‘पुष्पा 2’?
पहिल्याच दिवशी ‘पुष्पा 2’ ला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोक थिएटरसमोर फटाके फोडत आहेत, थिएटर्सबाहेर चाहत्यांची गर्दी होत आहे. अशातच आता कमाईच्या बाबतीत हा चित्रपट ‘केजीएफ 2’, ‘बाहुबली 2’ आणि ‘कल्की 2898 एडी’ सारख्या अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड तोडणार आहे. या चित्रपटाचे ओटीटीचे अधिकार नेटफ्लिक्सने विकत घेतले आहेत.
हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर कधी रिलीज होईल याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. प्रत्येक चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर दीड ते दोन महिन्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर येतो. अशा परिस्थितीत हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येईल. ‘पुष्पा २’ हा २०२१ साली प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ चित्रपटाचा दुसरा भाग आहे. यात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फाजिल यांच्यासह जगपती बाबू आणि अनसूया भारद्वाज यांच्यासह अनेक कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
हेही वाचा – प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलाला ड्रग्ज प्रकरणात अटक
ऑनलाइन लीक झाला चित्रपट
चित्रपट रिलीजच्या पहिल्याच दिवशी अवघ्या काही तासांतच लीक झाल्याने निर्मात्यांना मोठा धक्का बसू शकतो. ‘पुष्पा 2’ रिलीज झाल्यानंतर पायरसी प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन लीक झाला आहे. आता लोक हा सिनेमा मोफत डाउनलोड करून पाहू शकतात. हा सिनेमा पायरसी प्लॅटफॉर्मवर 1080p, 720p, 480p, 360p, 240p, HD मध्ये लीक झाला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या कलेक्शनवर परिणाम होण्याची शक्यता आहे.