ऑक्टोबर महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर नवे आणि हटके आशय असणाऱ्या वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या आठवड्यात ‘नेटफ्लिक्स’, ‘प्राइम व्हिडीओ’, ‘डिज्नी प्लस हॉटस्टार’ आणि इतर अनेक प्लॅटफॉर्मवर नवनवीन चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होत आहेत. या आठवड्यात ओटीटीवर ‘रात जवान है’, ‘जिंदगीनामा’, ‘सरफिरा’ यांसारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे. या आठवड्यातील ओटीटीवर नवे सिनेमे कधी येणार आणि त्याच्या प्रदर्शनाच्या तारखा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्यांचा तुम्ही आनंद घेऊ शकता.

जिंदगीनामा

‘सोनी लिव्ह’ची आगामी वेब सीरिज ‘जिंदगीनामा’ मानसिक समस्यांवर प्रकाश टाकते. या सीरिजमध्ये सहा वेगवेगळ्या कथा दाखवण्यात आल्या आहेत, ज्यात प्रत्येक पात्राच्या मानसिक संघर्षांवर भाष्य करण्यात आलं आहे. यात प्राजक्ता कोळी, सुमित व्यास, श्वेता बसू प्रसाद, मराठमोळे प्रिया बापट आणि श्रेयस तळपदे यांसारखे प्रतिभावान कलाकार झळकणार आहेत. ही वेब सीरिज १० ऑक्टोबर २०२४ रोजी ‘सोनी लिव्ह’वर प्रदर्शित होणार आहे.

Bride beautiful dance
‘नवरीने वरात गाजवली…’ स्वतःच्या लग्नात घोड्यावर बसून केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
IMDB most anticipated movie
२०२५ मध्ये ‘या’ २० चित्रपटांची सिनेप्रेमींना आहे प्रतीक्षा, सलमान खान पासून ते अक्षय कुमार पर्यंत ‘या’ स्टार्सच्या सिनेमांचा आहे समावेश
amazon prime comedy movie
‘चुपके चुपके’ ते ‘वेलकम’ प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे ‘हे’ गाजलेले विनोदी सिनेमे, पाहा यादी
Shiva
Video : “ही लग्नाची पत्रिका…”, शिवाला आशूच्या लग्नाचे आमंत्रण मिळणार अन्….; पाहा मालिकेचा प्रोमो
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
Maharashtra News Live Updates in Marathi
Maharashtra News : वाल्मिक कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी
premachi goshta 2
मराठी चित्रपट ‘प्रेमाची गोष्ट २’ची रिलीज डेट ठरली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा

हेही वाचा…थ्रिलर, सस्पेन्स आणि क्राइमचा थरार अनुभवायचा आहे? मग एकदा पाहाच ‘या’ दाक्षिणात्य वेब सीरिज…

वाझाई

मरी सेल्वाराज लिखित व दिग्दर्शित हा तमिळ चित्रपट एका तरुण मुलाच्या प्रवासाची कहाणी सांगतो. या चित्रपटात एक तरुण मुलगा एकेदिवशी कामावर जात नाही आणि त्यातून अनेक अनपेक्षित घटना घडतात, ज्यामुळे त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. हा चित्रपट मरी सेल्वाराज यांच्या जीवनातील सत्य घटनांवर आधारित असल्याचं म्हटलं जातं. हा सिनेमा ११ ऑक्टोबर २०२४ रोजी ‘डिज्नी प्लस हॉटस्टार’वर प्रदर्शित होणार आहे.

सरफिरा

अक्षय कुमार अभिनीत हा चित्रपट २०२० मध्ये आलेल्या ‘सोरारई पोटरु’ या तमिळ सिनेमाचा रिमेक आहे. हा चित्रपट जी. आर. गोपीनाथ यांची प्रेरणादायी कहाणी सांगतो, जिथे एक सामान्य माणूस कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी परवडणारी एअरलाइन्स सुरू करण्याचा निर्णय घेतो. हा सिनेमा सत्यघटनेवर आधारित असून, ११ ऑक्टोबर २०२४ रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा…OTT वर फ्री आहेत या गाजलेल्या वेब सीरिज, तुम्ही पाहिल्यात का?

रात जवान है

ही हलकी-फुलकी आठ भागांची सीरिज तीन मित्रांची गोष्ट सांगते, जे पालकत्वाच्या आव्हानांशी सामना करत असतात, तसंच त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळत असतात. यात प्रिया बापट, बरुण सोबती आणि अंजली आनंद यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही वेब सीरिज ११ ऑक्टोबर २०२४ रोजी ‘सोनी लिव्ह’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader