राधे माँचा मुलगा हरजिंदर सिंह कलाविश्वात पदार्पण करत आहे. ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेब सीरिजमध्ये हरजिंदर महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या वेब सीरिजच्या माध्यमातून हरजिंदरने ओटीटीबरोबरच अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेब सीरिजमध्ये बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

हरजिंदर या वेब सीरिजमध्ये एसटीएफ पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. रणदीप हुड्डाबरोबर त्याने या सीरिजमध्ये स्क्रीन शेअर केली आहे. “इन्स्पेक्टर अविनाश एक चांगली वेब सीरिज आहे. या सीरिजमध्ये मी तरुण पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. उत्तर प्रदेशातील वाढत्या गुन्ह्यांसाठी त्याची पोलिसांत भरती करण्यात आली आहे. उत्कृष्ट कामगिरीने छाप पाडू इच्छिणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत मी आहे,” असं हरजिंदर म्हणाला.

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Sangeet Ceremony
Video : “कौमुदी या अखंड ताऱ्यांच्या…”, फिल्मी स्टाइल प्रपोज, जबरदस्त डान्स अन्…; मराठी अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला संगीत सोहळा

हेही वाचा>> Video : विशाखा सुभेदार व नम्रता संभेरावचा अमेरिकेत ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर डान्स, व्हिडीओ पाहिलात का?

“मला विविधांगी भूमिका साकारायच्या आहेत. सेलिब्रिटी नाही तर उत्तम कलाकार व्हायचं आहे. मी एका व्यावसायिक कुटुंबातील आहे. माझी स्वप्न साकार करण्यासाठी मला नेहमीच प्रोत्साहन मिळालं आहे. जर अभिनय क्षेत्रात माझं करिअर झालं नाही, तर मी व्यवसाय करेन,” असंही पुढे हरजिंदर म्हणाला. हरजिंदरची ही वेब सीरिज १८ मे रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित झाली आहे.

हेही वाचा>> “१५ लोकांनी महिनाभर रोज बलात्कार…”, ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्माचं वक्तव्य, म्हणाली, “प्रेमात…”

दरम्यान, राधे माँ अशी ओळख मिळवलेल्या सुखविंदर कौरने १७व्या वर्षी मोहन सिंह यांच्याबरोबर लग्न केलं. त्यांना हरजिंदर व भूपेंद्र ही दोन मुले आहेत.

Story img Loader