११ नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘मोनिका, ओ माय डार्लिंग’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये राजकुमार राव प्रमुख भूमिकेमध्ये आहे. त्याच्यासह राधिका आपटे, हुमा कुरेशी, सिंकदर खेर अशा कलाकारांनी या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटाद्वारे अभिनेत्री राधिका आपटे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी जून महिन्यामध्ये ती ‘फॉरेन्सिक’ या चित्रपटामध्ये झळकली होती. त्यानंतर तिने ‘विक्रम वेधा’ या चित्रपटामध्ये प्रिया हे पात्र साकारले. आता ती ‘मोनिका, ओ माय डार्लिंग’च्या माध्यमातून नव्या अवतारामध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

राधिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. ती इन्स्टाग्रामवर सतत काही ना काही पोस्ट करत असते. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओद्वारे तिच्या आगामी चित्रपटामधला लूक समोर आला आहे. चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये ती पांढऱ्या रंगाचे टीशर्ट, त्यावर लेदर जॅकेज आणि डोळ्यावर काळा चष्मा असा क्लासिक लूक केला आहे. व्हिडीओमध्ये ती “मला सिरीयसली घ्या… माझ्या सुंदर चेहऱ्याकडे पाहून मला हलक्यात घेऊ नका.. हा! मी इतकी सुंदर आहे तर त्याला मी काय करु”, असा राधिकाच्या आवाजामधील वाक्य ऐकायला येते. पुढे तिचा हसतानाचा आवाज सुद्धा ऐकू येतो. तसेच शेवटी ‘मोनिका, ओ माय डार्लिंग’ या गाण्यामधला काही भाग जोडण्यात आला आहे.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
prasad jawade reaction on amruta deshmukh enter in maharashtrachi hasyajatra
अमृता देशमुख ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये काम करणार असल्याचं समजताच नवऱ्याला झाला आनंद, अभिनेत्री म्हणाली…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Marathi actress Neelam Shirke Why did leave the acting field
एकेकाळी टॉपला असणारी नीलम शिर्के इंडस्ट्रीपासून का दूरावली? सध्या काय करते? जाणून घ्या…

आणखी वाचा – लोकांना सूर्यग्रहणापासून वाचवण्यासाठी सरकारने घेतली होती धर्मेंद्र- अमिताभ बच्चन यांची मदत, नेमकं काय घडलं? वाचा

या व्हिडीओला तिने “मर्डर, चोरी, अपहरण सगळ्या केसेस सोडवणार ही एसीपी नायडू” असे कॅप्शन दिले आहे. यावरुन तिच्या पात्राचे नाव एसीपी नायडू असल्याचे लक्षात येते. काही दिवसांपूर्वी चित्रपटामधील अन्य कलाकारांचे मोशन पोस्टर्ससुद्धा शेअर करण्यात आले. चित्रपटाच्या टीझर आणि पोस्टर्सवरुन हा चित्रपट सस्पेन्स थ्रिलर या शैलीमधला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आणखी वाचा – Bigg boss 16: अब्दू रोजिकची भारतातली पहिली दिवाळी ठरली खास, ‘बिग बॉस’च्या घरी मिळाले मोठे सप्राईज

राधिकाने नेटफ्लिक्सने निर्मिती केलेल्या अनेक कलाकृतींमध्ये काम केले आहे. मध्यंतरी राधिका त्यांच्या प्रत्येक सीरिजमध्ये, चित्रपटामध्ये झळकली होती. यावरुन बरेचसे मीम्सदेखील व्हायरल झाले होते.

Story img Loader