९ फेब्रुवारी रोजी रजनीकांत यांचा बहुचर्चित ‘लाल सलाम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या माध्यमातून रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत हिने पुन्हा दिग्दर्शनात कमबॅक केलं. यामध्ये रजनीकांत हे पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकले असून त्यांचा यातील स्वॅग प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. ‘जेलर’च्या तुलनेत रजनीकांत यांच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा चित्रपट रजनीकांत यांच्या कारकीर्दीतील सर्वात कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ११ दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त १६.३४ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहता याचे निर्माते आता याच्या ओटीटी प्रदर्शनाच्या तयारीत लागले आहेत. धार्मिक एकोप्याविषयी भाष्य करणारा हा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे अन् एका चित्रपटाचा विषयही तितकाच संवेदनशील आहे.

आणखी वाचा : Pathaan 2 Update: स्पाय युनिव्हर्सबद्दल मोठी अपडेट; किंग खानच्या ‘पठाण २’च्या शूटिंगला लवकरच होणार सुरुवात

हा चित्रपट साऱ्या देशभरात वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित न केल्याने हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्याचा अंदाज बऱ्याच ट्रेड एक्स्पर्टनी लावला आहे. एकूणच चित्रपटाची कामगिरी पाहता याचे डिजिटल अधिकार कुणीच विकत घ्यायला तयार नव्हते पण आता ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मने या चित्रपटाच्या डिजिटल हक्क विकत घेतल्याचं सांगितलं जात आहे. तर सॅटेलाइट हक्क ‘सन टीव्ही’ने विकत घेतल्याचं स्पष्ट झालं आहे.

याचाच अर्थ रजनीकांत यांचा ‘लाल सलाम’ हा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळू शकतो. अद्याप याविषयी अधिकृत घोषणा झालेली नाही. पण ‘लाल सलाम’ हा चित्रपट पुढील महिन्यात नेटफ्लिक्सवर पाहायला मिळू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटल्याने ‘लाल सलाम’ ४० दिवसांच्या आतच ओटीटी वर उपलब्ध होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajinikanth starrer lal salaam is now ready for ott streaming avn
Show comments