नेटफ्लिक्सवर मध्यंतरी ‘ट्रायल बाय फायर’ नावाची वेबसीरिज प्रदर्शित झाली. १९९७ साली दक्षिण दिल्लीमधील ‘उपहार’ चित्रपटगृहाला लागलेल्या भीषण आगीवर ही वेबसीरिज बेतलेली होती. यात अभय देओल आणि मराठमोळी अभिनेत्री राजश्री देशपांडे मुख्य भूमिकेत आहेत. राजश्रीने याआधीदेखील आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. नुकतीच तिने दिलेल्या मुलाखतीत वेबसीरिज आणि बोल्ड दृश्यांवर भाष्य केलं आहे.

‘सेक्रेड गेम्स’मधील तिच्या भूमिकेची आणि तिने दिलेल्या बोल्ड सीन्सची खूप चर्चा झाली. या सगळ्याचा तिच्या फिल्मी करिअरवर नेमका काय परिणाम झाला याबद्दल नुकतंच राजश्रीने भाष्य केलं आहे. सेक्रेड गेम्सबरोबरच राजश्रीचा मल्याळम चित्रपट ‘एस दुर्गा’सुद्धा वादाच्या भोवऱ्या अडकल होता. या दोन्ही भूमिकांमुळे राजश्री अशा बोल्ड भूमिका करायला लगेच तयार होते असा समज तेव्हा चित्रपटसृष्टीत झाला असल्याचंही तिने स्पष्ट केलं.

kshitee jog mugdha karnik
‘पारू’ फेम मुग्धा कर्णिक क्षिती जोगबरोबरच्या मैत्रीबद्दल म्हणाली, “मी कुठल्या अडचणीत…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
paaru fame sharayu sonawane get ukhana for husband Jayant lade
“संसार असतो दोघांचा…”, ‘पारू’ फेम अभिनेत्री शरयू सोनावणेने घेतला हटके उखाणा, म्हणाली…
Komal More
“शत्रूला पोत्यात भरून…”, ‘लाखात एक आमचा दादा’मधील तेजूच्या व्हिडीओवर नेटकऱ्याची कमेंट, अभिनेत्री उत्तर देत म्हणाली…
lakshmichya pavalani new promo
Video : अद्वैत नयनाला कलाची माफी मागायला लावणार! पाहा ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेचा नवा प्रोमो
chhaava movie lezim scene controversy marathi actress ruchira jadhav
“चित्रपट बघण्याआधीच निर्बुद्धपणे…”, ‘छावा’च्या वादावर मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत; म्हणाली, “माझ्या राजाला…”
Marathi actress Tejashri Pradhan talk about social media
“फक्त हे मृगजळासारखं…”, सोशल मीडियाबाबत तेजश्री प्रधानने मांडलं मत; तरुणपिढीला सल्ला देत म्हणाली, “आपण आयुष्यात…”
Tejshree Pradhan
“जे हक्काचे…”, तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यावर काय करतेय? म्हणाली, “आताच्या घडीला…”

आणखी वाचा : ‘प्रोजेक्ट के’मधील प्रभासचा फर्स्ट लूक पाहून लोकांना आठवला ‘आयर्न मॅन’; पोस्टर पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

‘फिल्म कंपेनीयन’शी संवाद साधताना राजश्री म्हणाली, “सेक्रेड गेम्स आणि एस दुर्गा या दोन्ही भूमिकांची तेव्हा प्रचंड चर्चा होती. त्यामुळे मी अशा वादग्रस्त आणि बोल्ड भूमिकांसाठी अगदी योग्य आहे आणि यासाठी होकार लगेच देते असा बऱ्याच लोकांचा गैरसमज झाला. बरेच लोक माझ्याकडे असे प्रोजेक्ट घेऊन यायचे ज्यात कथा, पटकथा नावालाही नसायची.”

राजश्रीने आपल्या करियरची सुरवात नाटकांपासून केली. ‘तलाश’, ‘सेक्सी दुर्गा’, ‘चोक्ड’, ‘अ‍ॅन्ग्री इंडियन गॉडेस’ अशा वेगळय़ा धाटणीच्या चित्रपटांमधून तिने स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवला. ‘सेक्रेड गेम्स’मधील जबरदस्त बोल्ड भूमिकेमुळे राजश्रीला ओळख मिळाली.

Story img Loader