बॉलिवूडचा खिलाडीकुमार अर्थात अभिनेता अक्षय कुमार हा सिनेसृष्टीतील सर्वात व्यस्त अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील एकमेव अभिनेता आहे जो वर्षाला किमान ५ ते ६ चित्रपट करतो. अक्षय कुमारची गणना बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सुपरस्टार्समध्ये केली जाते. यावर्षी ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘बच्चन पांडे’, ‘बेल बॉटम’ असे अक्षयचे एकापाठोपाठ एक तीन चित्रपट सुपरफ्लॉप ठरले. तसेच आणखीन एक चित्रपट आपटला तो चित्रपट म्हणजे ‘रक्षाबंधन’.

आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ आणि अक्षयचा ‘रक्षाबंधन’ एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर दाखल झाले. दोन्ही चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. अक्षयच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे रक्षाबंधन हा चित्रपट आता आपल्याला ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपल्याला ५ ऑक्टोबरपासून हा चित्रपट पाहता येणार आहे. याआधी अक्षयचा ‘कठपुतली’ हा चित्रपट डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता.

बॉलिवूडमध्ये येणार आणखी एका चित्रपटाचा रिमेक! सलमान खान दिसणार मुख्य भूमिकेत?

झी स्टुडिओज, केप ऑफ गुड फिल्म्स आणि कलर यलो प्रॉडक्शन्स निर्मित, रक्षाबंधन या चित्रपटात पाच भावंडांची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात अक्षय बरोबर भूमी पेडणेकर, सादिया खतीब, दीपिका खन्ना, स्मृती श्रीकांत आणि सहजीन कौर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आनंद एल राय यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

अक्षयच्या आगामी रामसेतू चित्रपटाची झलक आपल्याला पाहायला मिळाली आहे. नुकताच ‘राम सेतु’चा टीझर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अक्षयचा एक नवा लूक पाहायला मिळत आहे. अक्षयच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केलं आहे. रामायणापासून प्रेरित होऊन या चित्रपटाची कथा तयार करण्यात आली आहे.

Story img Loader