सप्टेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपट सीरिजच्या पहिल्या भागाला उत्तम प्रतिसाद मिळाला. चित्रपटाच्या हीट किंवा फ्लॉप ठरण्यावरुन बरीच चर्चा झाली, मतभेद समोर आले. या चित्रपटाने जगभरात ४०० कोटीपेक्षा अधिक कमाई केली. चित्रपटातील व्हीएफएक्सची चांगलीच खिल्ली उडवली गेली. मात्र रणबीर आणि आलिया यांची केमिस्ट्रि लोकांना प्रचंड आवडली.

बॉयकॉट ट्रेंडचा या चित्रपटाला चांगलाच फटका बसला तरी याने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. आता या चित्रपटाच्या ओटीटी रिलीज बाबत बरीच चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे. हा चित्रपट सुरुवातीला नेटफ्लिक्सवर येऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात होती. आता मात्र डिज्नी प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा : Video: महेश मांजरेकरांच्या लेकीचं ‘ते’ कृत्य पाहून नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव; पाहा नेमकं काय घडलं?

हा चित्रपट पहिले दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार अशी चर्चा होती. पण आता डिज्नी प्लस हॉटस्टारने या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजसंदर्भात खुलासा केला आहे. ‘ब्रह्मास्त्र’ हिंदीमध्ये ४ नोव्हेंबर रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. ज्यांना हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहता आला नव्हता त्यांच्यासाठी आता ही सुवर्णसंधी आहे. तसेच रणबीर आणि आलिया यांचे चाहतेही या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची आतुरतेने वाट बघत होते.

‘ब्रह्मास्त्र’ने जगभरात ४०० कोटीहून अधिक आणि भारतात २६० कोटीहून अधिक कमाई केली. कोविडनंतर सर्वाधिक कमाई करणारा हा पहिला बॉलिवूडचा बिग बजेट चित्रपट ठरला. रणबीर कपूर, आलिया भट्टबरोबर या चित्रपटात अमिताभ बच्चन, मौनी रॉय, शाहरुख खान हे महत्त्वाच्या भूमिकेत होते. दिग्दर्शक अयान मुखर्जीने याचा पुढील भाग २०२५ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचं जाहीर केलं आहे.

Story img Loader