बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाने अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच मनोरंजनविश्वात आणि प्रेक्षकांच्या मनातही स्वत:चं स्थान निर्माण केलं. ‘हायवे’, ‘बॉम्बे टॉकीज’, ‘सरबजीत’, ‘जिस्म २’ या चित्रपटातील त्याचा अभिनय प्रेक्षकांना भावला होता. तर सध्या तो त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे खूप चर्चेत आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचे काम जोरदार सुरु असतानाच त्याच्या नव्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या पोस्टमधून त्याने आगामी ‘कॅट’ या वेब सिरीजच्या प्रदर्शनाची तारीख आज जाहीर केली आहे.

गेले अनेक महिने रणदीपच्या कॅट या वेब सिरीजची चर्चा रंगली होती. काही महिन्यांपूर्वी जेव्हा त्याने या सिरीजची घोषणा केली तेवहापासून त्याला नवीन भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. रणदीपही त्याच्या पोस्ट मधून किंवा इन्स्टाग्राम स्टोरीमधून या सिरीजबद्दल वेगवेगळे अपडेट देत होता. आता नुकतीच एक पोस्ट शेअर करत त्याने या सिरीजच्या रिलीजची तारीख जाहीर केली आहे.

आणखी वाचा : “माझे आगामी चित्रपट सुपरहिटच होणार कारण…”; शाहरुख खानने व्यक्त केला विश्वास

रणदीप हुड्डाची प्रमुख भूमिका असलेली ही सिरीज ९ डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी त्याने नेटफ्लिक्सच्या ‘एक्सट्रॅक्शन’ या सिरीजमध्ये काम केले होते. त्यानंतर जवळपास दोन वर्षांनी तो पुन्हा एकदा नेटफ्लिक्सवर झळकणार आहे. रणदीप हुडाची आगामी कॅट ही वेब सिरीज एक क्राईम ड्रामा आहे. पोस्ट शेअर करत रणदीपने लिहीलं, “आमच्याकडे एक परफेक्ट बातमी आहे. आमची ‘कॅट’ ही वेब सिरिज ९ डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवरून तुमच्या भेटीला येत आहे.”

हेही वाचा : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाबद्दल नवीन अपडेट, रणदीप हुड्डाने केली ‘ही’ मोठी घोषणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डाची आगामी क्राईम ड्रामा सिरीज ‘कॅट’ ही गुरनाम सिंगची कथा आहे, ज्याला आपल्या भावाचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात आपल्या अंधाऱ्या भूतकाळाला सामोरे जावे लागते. बलविंदर सिंग जंजुआ निर्मित आणि जेली बीन एंटरटेनमेंटच्या सहकार्याने मूव्ही टनेल प्रॉडक्शन निर्मित ‘कॅट’ या वेब सिरिजमध्ये रणदीप हुड्डाबरोबरच सुविंदर विकी, हसलीन कौर, गीता अग्रवाल, दक्ष अजित सिंग, सुखविंदर चहल, के.पी. सिंग, काव्या थापर, दानिश सूद आणि प्रमोद पठाल या कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.