‘पुष्पा’ चित्रपटामुळे लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री म्हणजे रश्मिका मंदाना, दाक्षिणात्य चित्रपटातील आघाडीची अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पहिले जाते. नॅशनल क्रश बनलेली रश्मिका नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. दाक्षिणात्य चित्रपटानंतर आता तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. रश्मिकाचा ‘गुडबाय’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तिने पहिल्यांदा अमिताभ बच्चन याच्याबरोबर काम केले मात्र या चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही. खरं तर रश्मिका वेगळ्या चित्रपटातून पदार्पण करणार होती.

सिद्धार्थ मल्होत्रा सह ती ‘मिशन मंजू’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती मात्र चित्रपटाची घोषणा डिसेंबर २०२० मध्ये करण्यात आली होती. तसेच हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र निर्मात्यांनी आता निर्णय बदलला असून ते आता ओटीटी माध्यमावर प्रदर्शित करणार आहेत. पाकिस्तानच्या अवैध आण्विक महत्त्वाकांक्षा आणि भारतीय गुप्तचर संस्थेचे मिशन यावर आधारित हा चित्रपट असणार आहे असे सिद्धार्थ मल्होत्राने सांगितले होते.

Theatre canteen owner bites man's ear over food bill during 'Pushpa 2' screening.
Pushpa 2 : चित्रपटगृहाच्या कॅन्टीन मालकाने घेतला पुष्पा २ पाहायला आलेल्या प्रेक्षकाच्या कानाचा चावा, मध्यांतरावेळी नेमकं काय घडलं?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
tharala tar mag kalpana thrown out sayali from house arjun emotional breakdown
ठरलं तर मग : कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटलं! सासुबाईंनी सायलीला घराबाहेर काढलं, अर्जुनला अश्रू अनावर…; पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Pushpa 2 Movie News
Pushpa 2 : ‘पुष्पा 2’ हजार कोटींच्या क्लबमध्ये, इतकी बक्कळ कमाई करणारे आणखी सहा चित्रपट कुठले?
CCTV installation completed two years ago but not fully utilized in the city
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे काम अपूर्णच, ६० कोटी रुपयांचे देयक महापालिकेने रोखले
upendra limaye first telugu film director praises him
उपेंद्र लिमयेंचा पहिला तेलुगू चित्रपट! थेट दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून कौतुक; म्हणाला, “सर कोणतीही भूमिका…”
Bollywood actress tripti dimri and shahid Kapoor will be seeon together in Vishal Bhardwaj's action film Arjun Ustra
रणबीर कपूर, विकी कौशलनंतर तृप्ती डिमरी ‘या’ चॉकलेट बॉयबरोबर रोमान्स करताना दिसणार; विशाल भारद्वाजच्या ‘अर्जुन उस्तरा’मध्ये झळकणार ही नवी जोडी

‘मिशन मंजू’ हा जून २०२२ मध्ये पडद्यावर येणार होता, परंतु उशीर झाला आणि आता निर्मात्यांनी आपले निर्णय बदलले आहेत. शंतनू बागची दिग्दर्शित हा चित्रपट पिंकव्हिलाच्या सूत्रानुसार १८ जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.बॉलिवूडमध्ये तिला अपयश जरी आले असले तरी सध्या ती ‘पुष्पा २ चित्रीकरणात व्यस्त आहे. रश्मिकाने २०१६ मध्ये ‘किरिक पार्टी’ (Kirik Party) या कन्नड चित्रपटाच्या माध्यमातून कारकीर्दीची सुरुवात केली होती.

Story img Loader