अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओची ‘मिर्झापूर’ ही वेब सीरिज खूप गाजली. उत्तर प्रदेश राज्यातील मिर्झापूर या शहरातली ही गोष्ट आहे. यामध्ये पंकज त्रिपाठी यांनी कालीन भैय्या हे मध्यवर्ती पात्र साकारले आहे. त्यांच्याव्यतिरिक्त अली फझल, दिव्येंदु शर्मा, रसिका दुगल, श्वेता त्रिपाठी अशा अनेक तगड्या कलाकारांनी या सीरिजमध्ये काम केले आहे. या सीरिजचे दोन सीझन प्रदर्शित झाले आहेत. ‘मिर्झापूर’ची मोठी फॅन फॉलोईंग आहे. या सीरिजचे चाहते नव्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या त्याचे चित्रीकरण सुरु आहे.

दरम्यान अभिनेत्री रसिका दुगलने एक फोटो शेअर करत सीरिजबद्दल नवी माहिती दिली आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय आहे. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर काही सेकंदाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या सीरिजमध्ये तिने कालीन भैय्याची पत्नी बीना त्रिपाठी ही व्यक्तिरेखा साकारली आहे. पोस्ट केलेल्या व्हिडीओला तिने “आणि शूटिंग संपलं! बीना… तुझा खोडकरपणा माझ्या स्मरणात राहील”, असे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा – “भारतातील माझ्या…” ‘स्क्विड गेम’ फेम अनुपम त्रिपाठीने घेतली दिग्दर्शक अनुराग कश्यपची भेट

तिने या व्हिडीओद्वारे तिच्या पात्राचे सीरिजमधले शूट संपले असल्याची घोषणा केली आहे. सुरुवातीला ती बीनासाठी वापरत असलेले सामान पॅक करताना दिसते. त्यानंतर पंकज त्रिपाठी, सीरिजचे दिग्दर्शक आणि संपूर्ण टीमसह केक कापून सेलिब्रेट करताना पाहायला मिळतात. रसिकाच्या या व्हिडीओमार्फत तिसऱ्या सीझनमध्ये तिच्या पात्राचा शेवट होणार असल्याचा अंदाज लावला जात आहे. त्यावेळी तिने “या सीरिजमधले कलाकार आणि टीम माझ्या कुटुंबाप्रमाणे आहेत. सोबत काम करताना आमच्यामध्ये नातेसंबंध निर्माण झाले. मिर्झापूरच्या सेटवर जाऊन माझ्या माणसांसह काम करणं मी मिस करणार आहे”, असे वक्तव्य केले.

आणखी वाचा – तापसीचा ‘दोबारा’ पासून ते प्राजक्ताच्या ‘मिसमॅच्ड’पर्यंत या आठवड्यामध्ये ओटीटीवर येणारे चित्रपट आणि वेब सीरिज

फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एंटरटेनमेंट या निर्मिती संस्थेने या सीरिजची निर्मिती केली आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये या सीरिजचा तिसरा सीझन प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Story img Loader