दाक्षिणात्य चित्रपटांची चर्चा कायमच होत असते. या चित्रपटांनी बॉलिवूडच्या चित्रपटांना मागे टाकले आहे. नुकताच प्रदर्शित झालेला ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा’ हा चित्रपट आपल्याला ओटीटी माध्यमावर बघायला मिळणार आहे. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट लवकरच हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. मूळ चित्रपट कन्नड भाषेत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार कांतारा ४ नोव्हेंबर रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ॲमेझॉन प्राईम या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित होईल अशी माहिती मिळाली आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन १ महिन्यानंतर हा चित्रपट ओटीटी माध्यमावर प्रेक्षकांना बघता येईल अशी अपेक्षा आहे. याबाबत निर्माते लवकरच माहिती देतील.
“तुषार कपूरशी माझं नाव जोडलं गेलं, तेव्हा…”; राधिका आपटेने केला खुलासा
‘कांतारा’ हा एक अॅक्शन-थ्रिलर आहे. यात कांबळा आणि बुटा कोलाच्या पारंपारिक संस्कृतीचा उत्सवावर बेतला आहे. यात ऋषभ दुहेरी भूमिकेत आहे. अनेकांनी हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट असल्याचे वर्णन केले आहे. केजीएफचे निर्माते होंबळे फिल्म्स अंतर्गत विजय किरगंडूर यांनी याची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचा हिंदी रिमेक १४ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी असेही सांगितले की चित्रपटाची हिंदी आवृत्ती संपूर्ण भारतात ८०० हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित केली जाईल.
या चित्रपटात किशोर, अच्युथ कुमार, प्रकाश थुमिनाड, प्रमोद शेट्टी आणि नवीन डी पडिल या कलाकारांचा समावेश आहे. अजनीश बी लोकनाथ यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. अरविंद एस कश्यप यांनी छायाचित्रण तर केएम प्रकाश आणि प्रतीक शेट्टी यांनी चित्रपटाचे संकलन केले आहे . प्रदर्शित झाल्यापासून सात दिवसात या चित्रपटाने ५० कोटींचा टप्पा गाठला आहे.