एका दाक्षिणात्य चित्रपटाचा मराठी रिमेक बॉक्स ऑफिसवर एक वेगळाच इतिहास रचेल असं कोणलाही वाटलं नव्हतं, पण रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या ‘वेड’ या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं होतं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. ७५ कोटींहून अधिक कमाई करणारा ‘सैराट’नंतर हा दूसरा चित्रपट ठरला. १०० कोटींचा टप्पा पार केला नसला तरी या चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इतकंच नव्हे तर त्याचदरम्यान आलेल्या शाहरुख खानच्या ‘पठाण’लासुद्धा या चित्रपटाने चांगली टक्कर दिली. गेले कित्येक दिवस प्रेक्षक या चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची वाट बघत होते, पण आता ती प्रतीक्षा संपली आहे. रितेश आणि जिनिलीयाचा ‘वेड’ लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे आणि प्रेक्षकांना त्याचा आनंद घेता येणार आहे.

आणखी वाचा : सलमान खानच्या चित्रपटांच्या सेटवर मुलींसाठी आहे ‘हा’ विशेष नियम; पलक तिवारीने केला खुलासा

खुद्द रितेश देशमुखने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून ‘वेड’च्या ओटीटी प्रदर्शनाबद्दल खुलासा केला आहे. चित्रपटगृहापाठोपाठ आता ‘वेड’ ओटीटीवरही धुमाकूळ घालण्यास सज्ज आहे. येत्या २८ एप्रिल पासून ‘वेड’ हा चित्रपट ‘डिज्नी प्लस हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघायला मिळणार आहे, इतकंच नव्हे तर हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये पाहता येणार असल्याने इतर भाषिक प्रेक्षकांनासुद्धा याचा आनंद घेता येणार आहे.

या चित्रपटाच्या टिझरला, सगळ्या गाण्यांना आणि ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. त्यामुळे चित्रपट चांगलीच कामगिरी करणार हा विश्वास सगळ्यांना होता. या चित्रपटात रितेश-जिनिलियाबरोबरच अभिनेते अशोक सराफ, शुभंकर तावडे, जिया शंकर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. त्याचप्रमाणे अभिनेता सलमान खान या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riteish deshmukh and genelia deshmukh starrer marathi movie ved ott release date avn