दिग्दर्शक रोहित शेट्टी हा त्याच्या स्टंटबाजीसाठी ओळखला जातो. त्याच्या प्रत्येक चित्रपटामध्ये कलाकार खतरनाक स्टंट करताना दिसतात. पण आता शूटिंग करताना रोहितला दुखापत झाली असून त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे.

रोहित सध्या त्याच्या आगामी ‘इंडियन पुलिस फोर्स’ या सिरीजच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या सिरीजचं शूटिंग हैद्राबादमध्ये सुरू आहे. याच सिरीजच्या चित्रीकरणादरम्यान त्याला दुखापत झाल्याचं समोर आलं आहे.

आणखी वाचा : Video: …अन् सारा अली खान रितेश देशमुखशी चक्क मराठीत भांडू लागली, व्हिडीओ व्हायरल

या सिरीजमधील कारच्या एका सिक्वेन्सच्या शूटिंगदरम्यान रोहित शेट्टीच्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर प्रॉडक्शन टीमने त्याची हैद्राबादच्या कामिनेनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिथे डॉक्टरांनी त्याच्यावर किरकोळ शस्त्रक्रिया केली आणि रोहित शेट्टीला लगेच डिस्चार्जही देण्यात आला.

हेही वाचा : तगडी स्टारकास्ट आणि दीपिकाचा कॅमिओ असूनही ‘सर्कस’ची जादू फिकी, पहिल्या दिवशी जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

या सिरीजच्या माध्यमातून रोहित शेट्टी पहिल्यांदाच वेब सिरीज या माध्यमात पदार्पण करणार आहे. या सिरीजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, विवेक ओबेरॉय, शिल्पा शेट्टी कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. यावर्षी ही सिरीज प्रदर्शित होईल असेही बोलले जात आहे.

Story img Loader