Romantic Thriller Movies On OTT: तुम्हाला ‘सनम तेरी कसम’सारखे चित्रपट पाहायला आवडत असतील तर ओटीटीवर असे बरेच सिनेमे उपलब्ध आहेत. मावरा होकेन व हर्षवर्धन राणे यांच्या ‘सनम तेरी कसम’ने पुन्हा प्रदर्शित झाल्यावर इतिहास रचला. ९ वर्षांपूर्वी रिलीज झालेला हा सिनेमा तेव्हा फ्लॉप ठरला होता, पण आता तो सुपरहिट ठरला आहे. तुम्ही या चित्रपटाचे चाहते असाल तर तसेच काही चित्रपट घरबसल्या पाहू शकता.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या अशाच टॉप ५ चित्रपटांची नावं जाणून घेऊयात.
चार्ली
Charlie on OTT : २०१५ मध्ये रिलीज झालेला ‘चार्ली’ एक रोमँटिक-थ्रिलर चित्रपट आहे. याचं दिग्दर्शन मार्टिन पँटने केलं आहे. यात दुलकर सलमान, पार्वती यांच्यासह अनेक कलाकार आहेत. चार्लीला फिरायला आवडत असतं, तो आयुष्य जगण्यात विश्वास ठेवणारा असतो. तो इतरांनाही आनंदी ठेवण्यासाठी धडपडत असतो. तो ग्राफिक आर्टिस्ट असतो. या चित्रपटात चार्ली व टेसा यांची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.
अमरन
Amaran on Netflix : राजकुमार पेरियासामी दिग्दर्शित या तमिळ चित्रपटात शिवकार्तिकेयन आणि साई पल्लवीची जोडी आहे. हा सिनेमा लोकांना खूप आवडला होता. ‘इंडियाज मोस्ट फिअरलेस: ट्रू स्टोरीज ऑफ मॉडर्न मिलिटरी हीरोज’ या पुस्तकातील मेजर मुकुंद वरदराजन यांच्यावर आधारित हा सिनेमा आहे.
‘अमरन’ हा चित्रपट मेजर मुकुंद आणि त्यांची पत्नी इंदू रेबेका वर्गीस यांची प्रेम कहाणी आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात मेजर मुकुंद यांना आलेलं वीरमरण यावर बेतलेला आहे. हा चित्रपट तुम्हाला नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
पास्ट लाइव्ह्ज
Past Lives on OTT: पास्ट लाइव्ह्ज हा २०२३ साली प्रदर्शित झालेला रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. ग्रेटा ली, टीओ यू आणि जॉन मॅगारो यांच्या यात भूमिका आहेत. यात दोन मित्रांची कथा दाखवण्यात आली आहे, जे त्यांची आयुष्ये वेगवेगळ्या पद्धतीने जगत असतात. हा चित्रपट तुम्हाला प्राइम व्हिडीओवर पाहता येईल.
96
याच यादीतील एक चित्रपट म्हणजे 96 आहे. हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. यात विजय सेतुपती, त्रिशा कृष्णन यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचं झाल्यास यात एकाच शाळेत शिकणाऱ्यांची कथा आहे. या दोघांचं एकमेकांवर प्रेम असतं पण ते वेगळे होतात. त्यानंतर जेव्हा दोघे पुन्हा भेटतात तेव्हा त्यांचे आयुष्य बरेच बदललेले असते. हा चित्रपट तुम्हाला सोनी लिव्हवर पाहता येईल.
डिअर कॉम्रेड
Dear Comrade on OTT: विजय देवरकोंडा, रश्मिका मंदाना आणि श्रुती रामचंद्रन यांचा ‘डिअर कॉम्रेड’ गाजलेला तेलुगू सिनेमा आहे. या चित्रपटात एक कोच महिला क्रिकेटरला त्रास देतो, त्याचा बदला तिचा बॉयफ्रेंड घेतो. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.