Romantic Thriller Movies On Prime Video: तुम्हाला वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या प्रकारचा कंटेंट पाहता येतो. जगभरातील चित्रपट, मालिका, सीरिज तुम्ही घरबसल्या पाहू शकता. तुम्हाला चित्रपटगृहात न जाता घरी ओटीटीवर चित्रपट पाहायला आवडत असतील आणि कॉमेडी, हॉरर, ॲक्शन बघण्याचा कंटाळा आला असेल, तर आता आम्ही तुम्हाला अशा पाच रोमँटिक थ्रिलर चित्रपटांबद्दल सांगत आहोत, जे तुम्ही पाहू शकता. हे सर्व चित्रपट तुम्हाला एकाच डिजिटल प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओवर पाहता येतील.
ओटीटीवर उपलब्ध असलेल्या या रोमँटिक थ्रिलर चित्रपटांमध्ये अनेक प्रकारचे चढ-उतार अतिशय उत्तम प्रकारे मांडण्यात आले आहेत. या चित्रपटांच्या कथा तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतील.
हेही वाचा – सोनाली बेंद्रेबरोबरच्या अफेअरबद्दल विचारताच पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी म्हणाला, “आता आम्ही…”
े
किलर हीट
Killer Heat on OTT : ‘किलर हीट’ हा एक मिस्ट्री रोमँटिक चित्रपट आहे, जो याच वर्षी प्रदर्शित झाला. यात जोसेफ गॉर्डन-लेविट, शॅलेन वुडली आणि रिचर्ड मॅडेन यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट फिलिप लॅकोटने दिग्दर्शित केला आहे. ही जुळ्या भावांची कथा आहे. हा सिनेमा प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.
वन नाइट स्टँड
One Night Stand on OTT : ‘वन नाईट स्टँड’ हा बॉलीवूडमधील रोमँटिक थ्रिलर चित्रपटांपैकी एक आहे, जो लोकांना खूप आवडला होता. या चित्रपटात एक विवाहित जोडपं वन नाईट स्टँडसाठी आपल्या जोडीदारांची फसवणूक करतात. यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त करते, त्यानंतर जे घडते ते खूप धोकादायक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जास्मिन डिसूजाने केले असून यात सनी लिओन, न्यारा बजाज आणि तनुज विरवानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा प्राइम व्हिडीओवर पाहता येईल.
हेही वाचा – ‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
कार्तिक कॉलिंग कार्तिक
Karthik Calling Karthik on Prime Video : फरहान अख्तर आणि दीपिका पादुकोणच्या मुख्य भूमिका असलेला हा थ्रिलर रोमँटिक चित्रपट २०१० साली प्रदर्शित झाला होता. त्यावेळी या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. हा सिनेमा तुम्हाला प्राइम व्हिडीओवर पाहता येईल.
फना
Fanaa on OTT : २००६ मध्ये रिलीज झालेला आमिर खान आणि काजोल स्टारर ‘फना’ चित्रपट लोकांना खूप आवडला होता. या चित्रपटाच्या कथा आणि गाण्यांना लोकांनी भरभरून प्रेम दिले होते. या कथेच्या शेवटी नायक खलनायक ठरतो. हा चित्रपट फक्त प्राइम व्हिडीओवर पाहता येईल.
ऐतराज
Aitraaz on OTT : प्रियांका चोप्रा, अक्षय कुमार आणि करीना कपूर यांचा २००४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘ऐतराज’ हा देखील हिट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. अक्षय आणि करीनाचे चाहते प्राइम व्हिडीओवर हा सिनेमा पाहू शकतात.