सचिन पिळगांवकर निर्मित, दिग्दर्शित ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटासाठी प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता पाहायला मिळाली. या चित्रपटाची घोषणा होताच सोशल मीडियावर ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटातील मजेशीर डायलॉग, गाणी व्हायरल झाली होती. १९ वर्षांनंतर ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपट २० सप्टेंबरला प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला.

‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाने प्रदर्शनानंतर पहिल्याच आठवड्यात बक्कळ कमाई केली. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १.८६ कोटींची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २.४३ कोटी आणि तिसऱ्या दिवशी ३.५५ कोटींचा गल्ला ‘नवरा माझा नवसाचा २’ने जमवला. मग या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त घौडदोड पाहायला मिळाली.

Phullwanti on OTT
घरबसल्या पाहा प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ सिनेमा; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर आहे उपलब्ध
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
biggest Flop bollywood Movie of 2024
बॉलीवूड कलाकारांची फौज, तब्बल ३५० कोटींचे बजेट; मात्र चित्रपट ठरला सुपरफ्लॉप, कमावले फक्त…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर
yek number OTT release update
तेजस्विनी पंडित निर्मित ‘येक नंबर’ घरबसल्या पाहता येणार, ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट

हेही वाचा – “प्रिय आजोबा…”, मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक राजशेखर यांच्या नातवाने लिहिलं भावुक पत्र, म्हणाला…

एका वेगळ्या नवसाची गोष्ट प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अलीसागर, विजय पाटकर, निर्मिती सावंत, निवेदिता सराफ, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार, जयवंत वाडकर अशी दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळाली. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन ५० दिवस पूर्ण झाले आहेत. अजूनही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करत आहे.

काही दिवसांपूर्वी ब्लॉकबस्टर ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाची सक्सेस पार्टी जोरदार पार पडली. या सक्सेस पार्टीमध्ये चित्रपटातील कलाकार मंडळींसह इतर कलाकारांनी खास उपस्थिती लावली होती. याचे फोटो, व्हिडीओ चित्रपटातील कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. ५० दिवसांनंतर आता ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. यासंदर्भात सचिन पिळगांवकर यांनी नुकतीच पोस्ट केली आहे. “आता ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपट ‘अमेझॉन प्राईम’वर प्रदर्शित झाला असून चित्रपटगृहात देखील सुरू आहे”, असं सचिन पिळगांवकरांनी त्यांच्या पोस्टमधून सांगितलं आहे.

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिजीत सावंतचा बाथरुममध्ये ‘अफगान जलेबी’ गाण्यावर जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा – Video:…म्हणून अंकिता वालावलकरने सूरज चव्हाणची घेतली उशीरा भेट, म्हणाली, “पॅडी दादा…”

माहितीनुसार, ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाचं बजेट ८ कोटींच्या आसपास होतं. हे बजेट चित्रपटाने फक्त चार दिवसांत वसूल केलं आहे. या चित्रपटाची नवसाची गोष्ट कोकण रेल्वे प्रवासात घडली आहे.

Story img Loader