सध्या ओटीटीवर एकाहून एक सरस अशा क्राइम थ्रिलर वेब सीरिज येत आहे. नुकतंच ‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा सीझन ३ चांगलाच गाजला. आता यापाठोपाठ अशीच एक ‘क्राइम बीट’ नावाची थ्रिलर वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या वेब सीरिजचा टीझर प्रदर्शित झाला असून एक वेगळाच थरार यातून अनुभवायला मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एक मिनिट आणि २० सेकंदांच्या या टीझरमध्ये वेब सीरिजमधील मुख्य अभिनेता साकीब सलीम हा एका पत्रकाराची भूमिका निभावत आहे, जो एका स्टोरीसाठी कोणाच्या तरी मागावर आहे, इतकंच नाही तर तो या टीझरमध्ये एक सत्य उघडकीस आणण्याबद्दलही बोलताना दिसत आहे. याबरोबरच टीझरमध्ये कॉमनवेल्थ गेम्समधील भ्रष्टाचार आणि राजकीय नेत्यांचा संबंध याबद्दल भाष्य करण्यात आलं आहे.

आणखी वाचा : अल पचिनो यांची २९ वर्षीय गरोदर गर्लफ्रेण्डकडे पितृत्व चाचणीची मागणी; अभिनेत्याचे कुटुंबीयही प्रचंड नाराज

यामुळे हा टीझर आणखीनच थरारक बनला आहे. यामध्ये साकीब सलीम, केनडी स्टार राहुल भट हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. शिवाय हृतिक रोशनची गर्लफ्रेण्ड सबा आझादसुद्धा यात छोटीशी भूमिका साकारत आहे. याबरोबरच किशोर कदम, आदिनाथ कोठारे, सई ताम्हणकर हे मराठी कलाकारही यात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

आदिनाथ कोठारे एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत असून त्याचा हा डॅशिंग अवतार प्रेक्षकांना आवडला आहे. तर नेहमीप्रमाणेच सई ताम्हणकर या वेब सीरिजमध्ये बोल्ड भूमिकेत दिसणार आहे. सीरिजमधील सईचं पात्र नेमकं काय आहे याबद्दल फारसं सांगण्यात आलेलं नाही, पण यामध्ये मात्र तिचे काही बोल्ड सीन्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

त्या बोल्ड सीन्सची झलक आपल्याला या सीरिजच्या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. शिवाय स्विमिंग पूलमध्ये सईच्या एक प्रचंड हॉट लेस्बियन लिपलॉक सीनची झलकही आपल्याला पाहायला मिळत आहे. टीझरमधील सईच्या पात्राची आणि या लेस्बियन लिपलॉकची प्रचंड चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे. आता या सीरिजमध्ये नेमकं काय पाहायला मिळणार यासाठी सगळेच लोक उत्सुक आहेत. अद्यापही या सीरिजच्या प्रदर्शनाबद्दल काहीच माहिती देण्यात आलेली नाही. सुधीर मिश्रा आणि संजीव कौल यांची ही ‘क्राइम बीट’ सीरिज ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.