मालिका, चित्रपटसृष्टी व वेब सीरिज अशा मनोरंजनाच्या तिन्ही माध्यमांतून अभिनेत्री सई ताम्हणकरने मोठं नाव कमावलं आहे. सई कायम वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिका साकारताना दिसते. सई सोशल मीडियावरही कायम सक्रिय असते. ती कायम तिच्या खासगी आयुष्यासह कामाबद्दल विविध अपडेट्स देत असते. नुकतीच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करीत तिच्या आगामी प्रोजेक्टची माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सईने नुकतीच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये सईचा नेटफ्लिक्स प्लॅटफॉर्मवरील एक फोटो आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लवकरच सर्वांसाठी एक खास सरप्राईज असल्याचं म्हटलं आहे. तसेच “३ फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सवर काय आहे ते तुम्ही शोधा”, असं तिनं यात लिहिलं आहे.

सईची ही पोस्ट तिच्या आगामी वेब सीरिजबाबत आहे. ती लवकरच ‘डब्बा कार्टेल’ या नव्या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामध्ये सई एका पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. सईने शेअर केलेल्या पोस्टप्रमाणे ‘डब्बा कार्टेल’ या वेब सीरिजचा ऑफिशियल ट्रेलर उद्या म्हणजेच ३ फ्रेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दोन दिवसांपूर्वीच ‘डब्बा कार्टेल’ या थ्रिलर वेब सीरिजचा टिझर समोर आला. काही महिलांच्या मदतीने जेवणाच्या डब्यातून ड्रग्सचा अवैध व्यवसाय सुरू असल्याचं टिझरमध्ये दाखवण्यात आलं आहे. त्यात सई ताम्हणकर पोलिसांच्या भूमिकेत असून, तिच्याकडे ही केस आलेली आहे. या केसचा उलगडा करण्यासाठी ती पुरावे शोधत असल्याचं दिसत आहे.

केव्हा प्रदर्शित होणार?

सई ताम्हणकरच्या ‘डब्बा कार्टेल’ या वेब सीरिजच्या प्रदर्शनाची तारीखही समोर आली आहे. नेटफ्लिक्सवर २८ फेब्रुवारीला ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे. सईसह या वेब सीरिजमध्ये शबाना आझमी, ज्योतिका, निमिषा सजयान, शालिनी पांडे, जिशू सेनगुप्ता, फरहान अख्तर या कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

सई ताम्हणकरने मराठी सिनेविश्व गाजवल्यानंतर आता ती वेब सीरिजच्या दुनियेतही नाव कमावत आहे. सईने मालिका विश्वातून आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती. ‘झी मराठी’ वाहिनीवरील २००३ मध्ये आलेली ‘तुझ्याविना’ ही सईची पहिलीच मालिका होती. त्यानंतर तिने ‘सनई चौघडे’ या चित्रपटात काम केलं. सईचा हा पहिलाच मराठी चित्रपट होता. पुढे ‘सुंबरान’, ‘गजनी’, ‘बे दुणे साडे चार’, ‘झकास’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’, ‘दुनियादारी’ अशा अनेक चित्रपटांतून सई ताम्हणकरने भूमिका केल्या आहेत.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sai tamhankar new web series dabba cartel trailer release 3 february on netflix rsj