मराठीमधील बोल्ड अन् बिनधास्त अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. तिने अभिनयातदेखील सरस आहोत हे दाखवून दिले आहे. सईने फक्त मराठी चित्रपट, मालिका, वेबसीरिमध्ये अडकून न राहता हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं आहे. ‘हंटर’ या चित्रपटातून तिने पहिल्यांदा हिंदीत काम केले आहे. त्यानंतर क्रिती सेनॉनबरोबर ‘मिमी’ चित्रपटात झळकली होती. सोशल मीडियावर सक्रिय राहत सई तिच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडींची माहिती देत असते. तिचे ग्लॅमरस फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. आता तिने एक वेगळाच फोटो शेअर करत ती नव्या लॉकडाऊनच्या तयारीत असल्याचे तिने सांगितले आहे.

आणखी वाचा : “तो मला रक्ताने…”; रवीना टंडनचा ‘या’ व्यक्तीबद्दल धक्कादायक खुलासा

vivek oberoi reveals why he rejected om shanti om film
विवेक ओबेरॉयचा १७ वर्षांनी खुलासा; शाहरुखचा ‘ओम शांती ओम’ सिनेमा का नाकारला? म्हणाला, ” तेव्हा ४ ते ५ महिने…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Gaurav More Hindi Film movie poster
फिल्टरपाड्याचा बच्चन हिंदी सिनेमात झळकणार! गौरव मोरेने शेअर केलं पहिलं पोस्टर; म्हणाला, “आशीर्वाद…”
nitish kumar Rahul Gandhi fact check photo
बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप! मुख्यमंत्री नितीश कुमार, तेजस्वी यादव अन् राहुल गांधीच्या VIRAL PHOTO मुळे चर्चांना उधाण; वाचा खरं काय?
Video of couple kissing metro station platform
मेट्रो स्टेशनवर ‘किस’ करणाऱ्या जोडप्याचा ‘तो’ Video Viral; नेटकरी म्हणे, “यात गैर काय”
Arvind kejriwal dr babasaheb ambedkars Fact Check marathi
अरविंद केजरीवालांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेले ‘ते’ आक्षेपार्ह विधान खरंच तसे आहे का? वाचा, VIRAL VIDEO ची खरी बाजू….
Viral video Jan Seva Kendra (mini-bank) in Uttar Pradesh's Saharanpur
Robbery in UP Bank : चोरानं समोर येऊन बंदूक रोखून धरली, तरी बँक कर्मचारी फोनवर निवांत बोलत होता! अखिलेश यादव यांची पोस्ट व्हायरल!
badshah post on diljit dosanjh ap dhillon dispute
दिलजीत दोसांझ आणि एपी ढिल्लनच्या वादात बादशाहने घेतली उडी; पोस्ट शेअर करत म्हणाला, “आम्ही केलेल्या चुकांची…”

सईने इन्स्टाग्रामवर तिचा एक नवा फोटो शेअर केला आहे. यात ती एका गावात राहणाऱ्या स्त्रीच्या वेशभूषेत दिसत आहे. तिने गुलाबी रंगाची साडी नेसली असून भांगेत सिंदूरही भरले आहे. अशा लुकमध्ये स्वतःला आरशात न्याहाळताना ती दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिलं, “इंडिया लॉकडाऊनची तयारी करत आहे.”

लवकरच तिचा एक हिंदी चित्रपट लवकर प्रदर्शित होणार आहे. हा फोटो तिच्या या आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘इंडिया लॉकडाऊन.’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मधुर भांडारकर यांनी केले आहे. सध्या सई या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. मध्यंतरी तिने या चित्रपटाचे एक पोस्टर शेअर करत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती. त्यानंतर आता या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा फोटो तिने शेअर केला आहे.

हेही वाचा : सई ताम्हणकर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये झळकणार, ‘या’ सुपरस्टारबरोबर शेअर करणार स्क्रीन

चित्रपटाच्या नावावरूनच हा चित्रपट नेमका कशावर आधारित असणार आहे हे प्रेक्षकांना समजले आहे. २०२० साली भारतात करोना महामारीमुळे लागलेल्या टाळेबंदीवर हा चित्रपट आधिरीत असणार आहे. ‘इंडिया लॉकडाउन’ या चित्रपटाची निर्मिती पीईएन स्टुडिओज, मधुर भांडारकरचे भांडारकर एंटरटेनमेंट आणि प्रणव जैन यांच्या पीजे मोशन पिक्चर्सचे डॉ. जयंतीलाल गडा यांनी केली आहे. मधुर भांडारकरबरोबर अमित जोशी आणि आराधना साह यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे. या चित्रपटाचा प्रीमियर २ डिसेंबर रोजी ‘झी5’ या ओटीटी प्लँटफॉर्मवर होणार आहे.

Story img Loader