अभिनेत्री सखी गोखले आणि अभिनेता सुव्रत जोशी मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. दोघे नेहमीच चर्चेत असतात. सखी गोखले तिच्या मनमोकळ्या स्वभावासाठी आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाते. ती सोशल मीडियावर सक्रिय असते. तसेच ती अनेकदा चाहत्यांच्या संपर्कात राहते. अलीकडेच, सखी गोखलेने तिचा नवरा अभिनेता सुव्रत जोशी यांच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्री सुश्मिता सेनच्या ‘ताली’ या वेबसीरीजमध्ये सुव्रतने तृतीयपंथीची भूमिका साकारली आहे. सूव्रतने साकारलेली या भूमिकेने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत अनेकांनी सुव्रतच कौतुक केलं आहे. सुव्रतची पत्नी अभिनेत्री सखी गोखलेने एक पोस्ट शेअर करत त्याच्या या भूमिकेचं कौतुक केलं आहे.
सखीने पोस्टमध्ये लिहिलं आहे. “सू मला तुझा खूप अभिमान वाटतो. काय सुंदर परफॉर्मन्स दिला आहेस तू. तुझ्याबरोबर राहूनसुद्धा तू या भूमिकेसाठी तयारी कधी केलीस हे माझ्यासाठी कोड आहे. तुझ्या अभिनयातून तू दाखवलेली संवेदनशीलता आणि आजवर दुर्लक्षित राहिलेल्या वारंवार अपमानित झालेलं जेंडर साकारण्यासाठी लागणारा समतोल साकारण्यासाठी तू खूप प्रयत्न केलेस हे दिसून येतयं. तू कायम स्वत:ला अशी आव्हान देत राहा आणि तुझ्या भवतीची बंधन तोडत रहा. आय लव्ह यू.

तू मला आज प्रेरणा दिलीस स्वत:च्या कलेत अजून नैपुण्य मिळवण्यासाठी आणि स्वत:च्या कलेशी एकनिष्ठ राहण्याची. याबरोबरच सखीने या वेबसीरीजचे लेखक क्षितीज पटवर्धन आणि दिग्दर्शक रवी जाधव अभिनेत्री सुष्मिता सेन यांचही पोस्टमधून कौतुक केलं.
ही वेबसीरिज जिओ सिनेमावर १५ ऑगस्टला प्रदर्शित झाली आहे. ही वेबसीरिज तृतीयपंथी लोकांसाठी झटणाऱ्या, त्यांच्यासाठी सतत काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्यावर आधारित आहे. यात गौरी सावंत यांची भूमिका अभिनेत्री सुश्मिता सेनने साकारली आहे.
सखी आणि सुव्रत यांची पहिली भेट ही ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेच्या सेटवर झाली. ११ एप्रिल २०१९ रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली. लॉकडाउनदरम्यान सखी आणि सुव्रत ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’ या मालिकेत एकत्र झळकले होते.