दोन आठवड्यांपूर्वी सुरू झालेला ‘बिग बॉस ओटीटी २’ हा शो चांगलाच चर्चेत आला आहे. पण या पर्वामध्ये घडलेल्या दोन घटनांमुळे प्रेक्षकवर्ग मात्र नाराज झाला आहे. शिवाय सलमान खानलाही स्पर्धकांनी नाराज केल्याचं शनिवारच्या विकेंडच्या वारमध्ये पाहायला मिळालं. दोन घटनांमुळे सलमान खाननं प्रेक्षकांची जाहीर माफी मागितली आहे. जर पुन्हा अशा घटना घडल्या तर शो सोडण्याची भाषाही सलमाननं केली. नेमकं काय घडलं जाणून घ्या.

मागील आठवड्यात आकांक्षा पुरी आणि जैद हदीद दोघेही ३० सेकंद किस करताना दिसले होते. यामुळे बिग बॉस ओटीटी शोला अडल्ट शो म्हटलं गेलं. तसेच टीआरपीसाठी हे सर्व सुरू असल्याचं म्हणत प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. ही घटना ताजी असतानाच बिग बॉसच्या घरात आणखी एक घटना घडली. जैद हदीदनं भांडता भांडता बेबिका धुर्वेसमोर आपली पँट काढली. यानंतर संपूर्ण घरात गोंधळ झाला. बेबिकानं गोंधळ घालत घर डोक्यावर घेतलं. “बिग बॉसच्या घरात एकतर मी राहीन नाही तर हा हदीद,” असं म्हणत तिनं बिग बॉसच्या घरातील दारासमोर ड्रामा केला. या दोन घटनेचा चांगलाच समाचार विकेंडच्या वारमध्ये सलमान खानने घेतला. पण या दोन घटनांमुळे प्रेक्षक नाराज झाले आहेत. परिणामी सलमानने सर्वांची जाहीर माफी मागितली.

tharala tar mag kalpana thrown out sayali from house arjun emotional breakdown
ठरलं तर मग : कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटलं! सासुबाईंनी सायलीला घराबाहेर काढलं, अर्जुनला अश्रू अनावर…; पाहा प्रोमो
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
chota pudhari aka ghanshyam darode bought new place from bb money
छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…
Shahrukh Khan
“अबराम व आर्यनचा…”, शाहरुख खान दोन्ही मुलांसह एकत्र काम करणार; अनुभव सांगत म्हणाला…
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा – ‘रामायण’ मालिकेतील लक्ष्मणाचा आलियाच्या सीतेच्या भूमिकेवर आक्षेप; म्हणाले, “अभिनेत्री टॅलेंटेड पण…”

हेही वाचा – विद्या बालनवर 5 स्टार हॉटेलसमोर आली होती भीक मागायची वेळ? अभिनेत्रीनं सांगितला ‘तो’ किस्सा

विकेंडच्या वारच्या सुरुवातीलाच सलमान म्हणाला की, “गेल्या आठवड्यात असं बरंच काही घडलंय, ज्याच्याबाबत तुम्हालाही जाणून घ्यायचं आहे आणि मलाही जाणून घ्यायचं आहे. याबाबत बरेच प्रश्न तुम्हालाही आहेत आणि मलाही पडले आहेत. बऱ्याच लोकांना घरात जे घडलं ते आवडलेलं नाही. पण ज्यांना हे आवडलं, त्याचं आपण काहीच करू शकतं नाही. परंतु मी या शोचा होस्ट आहे. अशा गोष्टी लोक शोमध्ये करतात. माझ्या चित्रपटात, शोमध्ये तुम्ही अशा गोष्टी कधीच पाहिल्या नसतील. त्यामुळे यांनी असं का केलं? पुढं जाऊन हे लोक असं करणार की नाही? हे त्यांच्याकडून जाणून घेऊया. जर अशा गोष्टी हे लोक पुढेही करणार असतील, तर मी हा शो होस्ट करणार नाही.”

हेही वाचा – केतकी चितळेच्या आयुष्यावर लवकरच प्रकाशित होणार पुस्तक, तुरुंगात जाण्याचा प्रवास उलगडणार

“बिग बॉस १६ मध्ये अब्दु रोजिक देखील परदेशातून आला होता. शोमध्ये त्यालाही प्रेम झालं होतं, त्यानंही खूप भांडणं पाहिली. पण त्यानं असं काही केलं नाही. चित्रपटात बऱ्याच लोकांनी नितंब दाखवले. मात्र असं काही केलं नाही. लोकांनी ऑनस्क्रीन किस केली आहे, पण अशी केली नाही. सर्व लोक हे करतात, ती त्यांची चॉइस आहे, परंतु माझी चॉइस वेगळी आहे. मला माफ करा. अशाप्रकारचा कॉन्टेंट मी माझ्या शोमध्ये दाखवू इच्छित नाही. त्यामुळे मी या सर्वांतर्फे आपली माफी मागतो. अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, याचा मी प्रयत्न करेन. मला माहीत आहे की गेल्या दोन सीझननंतर अनेक कुटुंबांनी हा शो पाहण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कुटुंब एकत्र बसून जसे माझे चित्रपट पाहतात, तसेच त्यांनी हा शो पाहावा हीच माझी इच्छा आहे. हे सर्व पाहून तुमची प्रतिक्रिया काय असेल हे मला माहीत नाही. पण माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला कळतं असेल की मी या दोन्ही घटनांंचे समर्थन करत नाही,” असं स्पष्ट मत सलमान खानने नोंदवलं आहे.

Story img Loader