‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या पर्वाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. युट्यूबर एल्विश यादव आणि आशिका भाटियाची वाइल्डकार्ड स्पर्धक म्हणून एन्ट्री झाल्यावर घरातील संपूर्ण वातावरण बदलले आहे. एल्विशने पहिल्याच आठवड्यात बिग बॉसच्या घरातील काही सदस्यांशी वाद घातला होता. यानंतर डिक्टेटरशिप टास्कमध्ये जिया शंकरने एल्विशला साबणाचे पाणी प्यायला दिले होते. या संपूर्ण प्रकारानंतर सलमान खान ‘वीकेन्ड का वार’मध्ये जियावर भडकला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Video : “तुझी लायकी नाही फक्त सैफमुळे…”, इब्राहिम अली खानची वागणूक पाहून नेटकरी संतापले, व्हिडीओ व्हायरल

सलमान ‘वीकेन्ड का वार’मध्ये जियाला म्हणाला, “जिया, एखाद्याला पाणी देणे ही खूप पवित्र गोष्ट असते…आणि त्याच पाण्यात तू साबण टाकलास?” यानंतर जिया काहीशी हसत म्हणते “मी खूप मोठी चूक केली मला कळतंय”, पुढे सलमान तिला सांगतो, “हसत हसत कोणी एखाद्याची माफी कशी मागू शकतं? साबणाचे पाणी प्यायला देऊन तू खरंच मोठी चूक केली आहेस…”

हेही वाचा : “ब्रा, ओल्ड मॉन्क…”, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटातील आक्षेपार्ह शब्दांवर सेन्सॉर बोर्डाची कात्री

सलमान बिग बॉसमधील इतर सदस्यांना उद्देशून म्हणाला, “तुम्हाला जिया काहीतरी चुकीचे करत आहे असे दिसतेय तर, याप्रकरणी तुम्ही काहीच का बोल्ला नाहीत?” सलमान खान भडकल्याचे पाहून जिया शंकरने एल्विश यादवची माफी मागितली. एल्विशनेही तिला लगेच माफ केले.

हेही वाचा : “तुम्ही खूप प्रेम…”, महाराष्ट्राच्या हास्यजत्रेला अमेरिकेत मिळणारा प्रतिसाद पाहून वनिता खरात भारावली, शेअर केला भावुक व्हिडीओ

बिग बॉसच्या घरात प्रत्येक सीझनमध्ये डिक्टेटरशिप टास्क खेळवला जातो. या टास्कमध्ये हुकूमशहा जे सांगेल ते ऐकावे लागते. एका टास्कमध्ये, बिग बॉसने एल्विश यादवला घराचा हुकूमशहा बनवले होते. जिया शंकर, अविनाश सचदेव आणि फलक नाझ या स्पर्धकांनी त्याच्या आदेशाचे पालन करण्यास नकार दिला. एल्विशने पाणी मागितल्यावर जियाने एका ग्लासमध्ये हॅंडवॉश मिस्क करून साबणाचे पाणी त्याला प्यायला दिले. जियाच्या याच कृतीमुळे सलमान खान भडकला होता.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan bashes jiya shankar for making elvish yadav drink soap water on bigg boss ott 2 sva 00