बिग बॉस ओटीटीचं दुसरं पर्व चांगलंच चर्चेत आलं आहे. सध्या शोचा होस्ट सलमान खान ट्रोलर्सच्या जाळ्यात अडकल्याचं पाहायला मिळत आहे. लाइव्ह शोमध्ये सलमानच्या हातात सिगारेट असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्यानं असभ्य कृत्य केल्याचं म्हटलं जात आहे. दुसऱ्या बाजूला बिग बॉस ओटीटीच्या चाहत्यांना सलमाननं एक आनंदाची बातमी दिली आहे. आता हा शो आणखी दोन आठवड्यांसाठी वाढवण्यात आल्याचं सलमाननं वीकेंडच्या वाराला जाहीर केलं.

ज्याप्रमाणे बिग बॉस ओटीटीचं पहिलं पर्व लोकप्रिय ठरलं. त्याप्रमाणे आता दुसऱ्या पर्वालाही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता हा शो दोन आठवड्यांसाठी वाढवण्यात आला आहे. त्याबाबत घोषणा करताना सलमाननं सांगितलं, “बिग बॉस ओटीटीचं दुसरं पर्व प्रेक्षकांना खूप आवडत आहे. या शोनं पहिल्याच दोन आठवड्यांमध्ये वॉच टाइमचा ४०० कोटी मिनिटांचा रेकॉर्ड केला आहे.”

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
water cut in Thane on Friday Water supply will be provided in phases for two days
ठाण्यात शुक्रवारी पाणी नाही; काही भागात दोन दिवस टप्प्याटप्प्याने होणार पाणीपुरवठा
Guru Asta 2025 Guru will set for 27 days in the new year
Guru Ast 2025: नवीन वर्षात २७ दिवसांनी अस्त होणार गुरू! ‘या’ राशींची होणार चांदी, झटपट वाढेल पगार
FIITJEE Chairman DK Goel abused employee during an online meeting video viral on social media
“कोर्टात जा आणि तक्रार कर…”, नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूटच्या चेअरमनने केली शिवीगाळ, मीटिंगमध्ये कर्मचाऱ्याला ओरडला अन्…, पाहा VIDEO
Winter Session Nagpur Maharashtra Assembly Opposition Leader Mahavikas Aghadi
बंगला सज्ज,विरोधी पक्ष नेत्याबाबत अनिश्चितता
Free Aadhaar update details in marathi
Free Aadhaar update: उरला फक्त शेवटचा १ दिवस, आधारकार्डशी संबंधित ‘हे’ काम पटापट करा, अन्यथा…;
chota pudhari aka ghanshyam darode bought new place from bb money
छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…

हेही वाचा – कार्तिक-कियाराच्या ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटाची ११व्या दिवशी दमदार कमाई, ‘आदिपुरुष’ला टाकलं मागे

आता बिग बॉस ओटीटीचं हे पर्व १३ ऑगस्टला संपणार आहे. यादरम्यान शोमध्ये स्पेशल वाइल्ड कार्ड एंट्री होणार असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या बिग बॉस ओटीटीच्या घरात अभिषेक मल्हन, फलक नाज, जिया शंकर, सायरस ब्रोचा, पूजा भट्ट, मनीषा रानी, जैद हदीद, अविनाश सचदेव व बेविका धुर्वे आहेत.

हेही वाचा – “मला तरी कुठे मिळालंय पारितोषिक?” केदार शिंदेंनी ‘ती’च्यासाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत; म्हणाले, “तिची निवड झाली नाही तर…”

हेही वाचा – “वडिलांचं नाव धुळीत…” असं म्हणत महिलेनं अभिषेक बच्चनच्या लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं?

दरम्यान, या वीकेंडच्या वारला कोणताही सदस्य घराबाहेर गेला नाही. पण, सायरस ब्रोचानं ‘बिग बॉस’कडे घराबाहेर जाण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच त्यानं सलमान खानकडेही यासाठी विनंती केली. या बाबतीत सलमान सायरसला खूप समजावताना दिसला; पण सायरस काही ऐकत नव्हता. त्यानंतर त्याला समजावण्यासाठी त्याचा खास मित्र कुणाल विजयकर याला वीकेंडच्या वारमध्ये बोलावण्यात आलं होतं. मात्र, सायरस शेवटपर्यंत त्याच्या मतावर ठाम राहिला.

Story img Loader