बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या सतत चर्चेत असतो. नुकताच सलमान ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात दिसला. अलीकडेच अशी बातमी समोर आली आहे की, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता भाईजान ओटीटीवर आपली दबंग स्टाईल दाखवण्यास सज्ज आहे. ही बातमी समोर आल्यामुळे सलमानचे चाहते खूपच उत्सुक झाले आहेत. काही मीडिया रीपोर्टनुसार सलमान लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार आहे.

एका प्रसिद्ध मीडिया हाऊसच्या रिपोर्टनुसार, सलमानला या ओटीटीसाठी एका वेब सीरिजची संकल्पना चांगलीच आवडली आहे आणि शिवाय ही वेब सीरिज अॅक्शनने भरलेली असणार आहे असं सांगितलं जात आहे. अद्याप या गोष्टींवर चर्चा सुरू असून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
shradhha kapoor shakti kapoor
शक्ती कपूर यांनी ‘ही’ सवय सोडण्यासाठी बिग बॉसमध्ये घेतला होता सहभाग; आठवण सांगत म्हणाले, “मी श्रद्धाला सिद्ध करून…”
Muramba
Video: “जोपर्यंत तू रमा…”, रमासारखी दिसणारी माही व अक्षय समोरासमोर येणार का? ‘मुरांबा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Central government Digital arrest
देशभरात ‘डिजीटल अरेस्ट’ची धास्ती, काय दिला जातो जनजागृतीपर संदेश
Pankaja Munde and Dhananjay Munde vs Suresh Dhas new controversy on political stage after elections
मुंडे बहीण-भाऊ विरुद्ध सुरेश धस, निवडणुकीनंतर राजकीय पटलावर नवा वाद
Chief Minister Devendra Fadnavis announces that Naxalism will be contained within three years Nagpur news
नक्षलवाद तीन वर्षांत आटोक्यात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; मुंबई-गोवा महामार्ग लवकरच पूर्ण
शहांच्या वक्तव्याचे विधानसभेत पडसाद

आणखी वाचा : IIFA 2023 मध्ये ‘गंगूबाई काठियावाडी’ व ‘विक्रम वेधा’चा डंका; रितेश देशमुखच्या ‘वेड’लाही मिळाला खास पुरस्कार

काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले आहे की, “सलमान या प्रोजेक्टबद्दल खूप उत्सुक आहे आणि लवकरच तो या प्रोजेक्टवर विचार करून काम सुरू करणार आहे.” सलमान खानकडे आदित्य चोप्राचा आणखी एक चित्रपट आहे, ज्यामध्ये शाहरुख खान आणि सलमान खान एकत्र दिसणार आहेत.

सलमानचे चित्रपट हे कौटुंबिक मनोरंजन करतात, त्यामुळे ओटीटीवर जरी तो कोणत्या वेब सीरिजमध्ये दिसला तरी त्यात बोल्ड कंटेंट फारसा आढळणार नाही. शिवाय नुकतंच सलमानने फिल्मफेअरदरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना ओटीटीवरील सेन्सॉरशीपवर भाष्य केलं होतं. याबरोबरच आता सलमान ‘बिग बॉस ओटीटी सीझन २’चंही सूत्रसंचालन करणार आहे. सैफ अली खान आणि शाहिद कपूरनंतर सलमान खान हा ओटीटीवर झळकणारा तिसरा बॉलिवूड स्टार ठरतोय की नाही ते येणारी वेळच सांगेल.

Story img Loader