सलमान खान आणि कतरिना कैफचा बहुचर्चित बहुप्रतीक्षित चित्रपट ‘टायगर ३’ १२ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या अगोदरपासूनच प्रेक्षकांमध्ये ‘टायगर ३’बाबत क्रेझ बघायला मिळाली होती. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने जबरदस्त कमाई केली होती. मात्र, त्यानंतर ‘टायगर ३’च्या कलेक्शनमध्ये सातत्याने घट पाहायला मिळाली होती.

हेही वाचा- ‘अ‍ॅनिमल’च्या OTT रिलीजबद्दल नवी अपडेट; वाचा कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार रणबीरचा चित्रपट

chris evans back to marvel films
‘कॅप्टन अमेरिका’ फेम अभिनेता क्रिस एव्हान्सचं मार्व्हल सिनेमात पुनरागमन; ‘या’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
IND vs AUS 3rd Test Match Timing Date Venue What Time Does the Gabba Test Start
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया गाबा कसोटी पहाटे किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या योग्य वेळ
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Pushpa 2 Movie News
Pushpa 2 : ‘पुष्पा 2’ हजार कोटींच्या क्लबमध्ये, इतकी बक्कळ कमाई करणारे आणखी सहा चित्रपट कुठले?
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
News About Marathi Drama Urmilyan
‘उर्मिलायन’ महाकाव्यातून उलगडणार रामायणातील लक्ष्मणच्या पत्नीचं कथाख्यान, ‘या’ दिवशी होणार शुभारंभाचा प्रयोग
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित

‘टायगर ३’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ४४.५ कोटींची कमाई केली होती. मात्र, दिवसेंदिवस या चित्रपटाच्या कमाईत घट होताना बघायला मिळत आहे. भारतात ‘टायगर ३’ला ३०० कोटींची कमाई करणे अवघड झाल्याचे दिसून येत आहे. भारतात या चित्रपटाने आतापर्यंत २७२.४३ कोटींची कमाई केली आहे; तर जगभरात या चित्रपटाने ४४७ कोटींचा गल्ला जमवला आहे. रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ आणि विकी कौशलच्या ‘सॅम बहादूर’ या चित्रपटांचा ‘टायगर ३’च्या कमाईवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा- Video: अखेर भांडण मिटलं! कपिल शर्मा-सुनील ग्रोव्हर सहा वर्षांनी दिसणार एकत्र; दोघांनी नव्या शोची केली घोषणा

चित्रपटगृहांमध्ये जरी सलमानच्या ‘टायगर ३’ची क्रेझ ओसरली असली तरी डिजिटल प्लॅटफॉर्मवर चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा करीत आहेत. लवकरच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. येत्या १२ डिसेंबरला हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे; पण अद्याप याबाबत कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा-

‘टायगर ३’मध्ये सलमान खान, कतरिना कैफबरोबर इमरान हाश्मीची मुख्य भूमिका आहे. इमरानने या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात हृतिक रोशन आणि शाहरुख खानने कॅमिओ केला आहे. ‘टायगर’ व ‘टायगर जिंदा है’प्रमाणे ‘टायगर ३’मध्येही प्रेक्षकांना सलमान आणि कतरिनाचा अ‍ॅक्शन  लूक बघायला मिळत आहे.

Story img Loader