बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा काल पार पडला. एल्विश यादव या दुसऱ्या पर्वाचा विजेता ठरला. बिग बॉसच्या इतिहास पहिल्यांदाच वाइड कार्ड एंट्री स्पर्धेक जिंकला. त्यामुळे सध्या एल्विशची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. पण अशातच दुसऱ्या बाजूला होस्ट सलमान खानने महाअंतिम सोहळ्यात केलेले एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे.

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवर रीलसाठी केली जाते अशी तयारी; जुई गडकरी व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

सलमान खानने बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्यात जेलमधल्या काही गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला की, “बिग बॉस ओटीटीमध्ये यंदाच्या पर्वात विशेषतः स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्यात आले. मागील पर्वाच्या तुलनेत यंदा बिग बॉसच्या घरातील बाथरूम खूप स्वच्छ होते, ही खूप चांगली गोष्ट आहे. कोणतेही काम असो ते लहान-मोठे नसते. आपण आपली सर्व काम स्वतः केली पाहिजे. मी जेव्हा बोर्डिंग स्कूलमध्ये होतो, तेव्हा सर्व काही मी स्वतः करत होतो. एवढेच नाही तर जेलमध्ये मी बाथरुम सुद्धा साफ करायचो. माझे जे काम असेल ते कमी कधीच इतर कोणाला करायला देत नसे.”

हेही वाचा – ‘ताली’ वेब सीरिज पाहिल्यानंतर गौरी सावंत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “तृतीयपंथीयांच्या पालकांना…”

पुढे सलमान म्हणाला की, “पूजा भट्टने यंदाच्या पर्वात घरातील बाथरूम साफसफाई करण्याची जबाबदारी चांगल्या रितीने सांभाळली. हे मला खूप आवडले.”

हेही वाचा – ‘बाईपण भारी देवा’नंतर सुकन्या मोने दिसणार ‘या’ चित्रपटात; शूटिंगला सुरुवात

दरम्यान, सलमानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, यंदा प्रदर्शित झालेला त्याचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई करू शकला नाही. त्यामुळे आता त्याच्या बहुप्रतिक्षित ‘टायगर ३’ चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो की नाही? हे येत्या काळात समजेल. दिवाळीच्या मुहूर्तावर सलमानचा ‘टायगर ३’ प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader