बॉलीवूडचा भाईजान सलमान खान काही दिवसांपासून चर्चेत आहे. गेल्या महिन्यात सलमानच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार झाला होता. या बातमीमुळे खूप खळबळ माजली होती. अशातच सलमानच्या बाबतीत अजून एक बातमी समोर आलीय; ज्यामुळे त्याच्या चाहत्यांना निराशेला सामोरं जावं लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस ओटीटी सीझन ३’ची सगळेच वाट पाहतायत. बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या सीजनसाठी बिग बॉस ओटीटीच्या शोच्या निर्मात्यांची तयारी सुरू झाली आहे.

हेही वाचा… प्रसिद्ध गायिका सावनी रविंद्र मत न देताच परतली; कारण सांगत म्हणाली, “वोटिंग ऑफिसरची…”

जेव्हा केव्हा बिग बॉसच्या शोचं नाव येत तेव्हा आपसूकच बॉलीवूडचा भाईजान सलमान खानचं नाव समोर येतं. पण, माहितीनुसार सलमान खान या शोमध्ये दिसण्याची शक्यता थोडी कमी आहे. याचं कारण सलमान त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असल्याचं बोललं जातंय.

हेही वाचा… VIDEO: करीना कपूर आणि सैफने केलं पापाराझींसमोर किस, व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी म्हणाले, “घरात यांना…”

पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार, बिग बॉस ओटीटी सीजन-३ च्या निर्मात्यांनी संजय दत्त, अनिल कपूर करण जोहर या बॉलीवूड सुपरस्टार सेलिब्रिटींना संपर्क साधला आहे. या प्रकल्पाच्या जवळच्या एका सूत्राने मीडिया पोर्टलला सांगितलं की, सलमान खानच्या तारखांचा खूप गोंधळ होतोय. तो खूप व्यग्र आहे. तरीही निर्माते या सुपरस्टारला शोमध्ये आणण्यास उत्सुक आहेत.

सूत्रानं असंही सांगितलं की, जर सलमानचं शेड्युल खूप व्यग्र असेल आणि त्याला खरंच जमणार नसेल, तर निर्मात्यांनी आधीच संजय दत्त, अनिल कपूर व करण जोहरला शो होस्ट करण्यासाठी संपर्क साधला आहे.

हेही वाचा… ठरलं तर मग: सायलीच्या भावना दुखावल्याने कुसुम अर्जुनकडे मागणार ‘हे’ वचन; पाहा प्रोमो

दरम्यान, सलमान खानच्या कामाबाबत सांगायचं झालं, तर सलमानचा आगामी चित्रपट ‘सिकंदर’ २०२५ मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात साऊथ स्टार रश्मिका मंदाना सलमानबरोबर पहिल्यांदा झळकणार आहे. प्रख्यात दिग्दर्शक ए. आर. मुरुगदास व सलमान या चित्रपटासाठी पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.

‘सिकंदर’च्या शूटिंगची सुरुवात मे महिन्यात सुरू होणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण भारत आणि युरोपमध्ये होणार आहे. चित्रपटाच्या बजेटबद्दल जरी अजूनही अधिकृत माहिती समोर आली नसली तरी अंदाजे या चित्रपटाचं बजेट ४०० कोटी इतकं असल्याचं बोललं जातंय. चाहते सलमान खान आणि रश्मिका मंदानाची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan wont be seen in bigg boss ott season 3 will sanjay dutt be host dvr