भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘सॅम बहादूर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात अभिनेता विकी कौशलने सॅम माणेकशॉ यांची भूमिका उत्तमरीत्या साकारली होती. १ डिसेंबरला ‘सॅम बहादूर’ चित्रपट अ‍ॅनिमल चित्रपटासह प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला अ‍ॅनिमल इतकेच यश मिळाले होते. त्यामुळे आता लवकरच ‘सॅम बहादूर’ चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विकी कौशल अभिनीत ‘सॅम बहादूर’ हा चित्रपट झी ५ वर प्रदर्शित होणार आहे. त्याची माहिती सोमवारी (२२ जानेवारी) झी ५ ने त्यांच्या सोशल मीडियावरील अधिकृत अकाउंटवरून दिली. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्यामुळे प्रेक्षकांसाठी ही एक पर्वणी आहे.

हेही वाचा… पहिल्या फोटोशूटला हृतिक रोशनने लपवली होती आपली ओळख; प्रसिद्ध फोटोग्राफरचा खुलासा

२६ जानेवारीपासून ‘सॅम बहादूर’ झी ५ वर पाहायला मिळणार असल्याचे पोस्टर शेअर करीत झी ५ ने चाहत्यांना सुखद धक्का दिला. पोस्टर पाहून चाहत्यांनी कमेंट्स सेक्शनमध्ये भरभरून प्रतिक्रिया दिल्या. एकाने कमेंटमध्ये लिहिले, “हा चित्रपट झी ५ वरील सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार आहे.” तर दुसर्‍याने लिहिले “हा चित्रपट मी पुन्हा पाहण्यासाठी उत्सुक आहे.”

हेही वाचा… “खोटे अश्रू”, आयरा खानने शेअर केला बाबा आमिर खानचा फोटो; म्हणाली…

मेघना गुलजार दिग्दर्शित ‘सॅम बहादूर’ चित्रपटात विकी कौशलव्यतिरिक्त अभिनेत्री सान्या मल्होत्रा, फातिमा सना शेख झळकली होती. सान्या ही सॅम माणेकशॉ यांच्या पत्नीच्या भूमिकेत असून, फातिमा भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसत आहे.

‘सॅम बहादूर’च्या कमाईबद्दल बोलायचं झाले, तर या चित्रपटाने जगभरात १३० कोटींचे कलेक्शन केले होते. भारतात विकीच्या या चित्रपटाने १०० कोटींहून कमाई केली होती.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sam bahadur ott release date declaired on zee 5 vicky kaushal starrer biographical war drama dvr