दक्षिणात्य अभिनेत्री समांथा रूथ प्रभू हिने तिच्या अभिनयाने आणि ग्लॅमरस अंदाजाने जगभरातल्या प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. दक्षिणात्य चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम भूमिका केल्यानंतर तिने यावर्षी बॉलिवूडमध्येही एन्ट्री केली. ‘यशोदा’ हा तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला. या चित्रपटातील तिच्या कामाचं सर्वांनीच कौतुक केलं. त्यानंतर तिच्याकडे बॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर्सची रांग लागली आहे. पण तब्येतीच्या कारणाने तिने बिग बजेट हिंदी वेब सिरीजला नकार दिलं असं बोललं गेलं. मात्र आता यामागचं सत्य समोर आलं आहे

समंथा रुथ प्रभू तिच्या तब्येतीमुळे सतत चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून समांथाची तब्येत बरी नसून ती एका गंभीर आजाराने त्रस्त आहे. सामंथाला मायोसिटिस नावाचा आजार झाला आहे असं तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट करत सांगितलं होतं. त्यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. तसंच तब्येतीच्या कारणाने ती काही काळ अभिनयातून ब्रेक घेणार अशाही चर्चा मध्यंतरी रंगल्या होत्या. याच कारणाने तिने काही बड्या बॉलिवूड प्रोजेक्ट्सना नकार दिल्याचंही बोललं गेलं.

thane woman suicide latest news in marathi
ठाणे : सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Parents Seeking Abortion, Abortion, High Court,
गर्भपाताची मागणी करणाऱ्या पालकांच्या भूमिकेचे आश्चर्य, उच्च न्यायालयाची टिप्पणी
Delhi CM Atishi
Video : बिधुरींच्या आक्षेपार्ह विधानानंतर वडिलांबद्दल बोलताना दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना अश्रू अनावर; म्हणाल्या, “ते इतके आजारी असतात की…”
journalists were murdered or killed last year
सत्तेला प्रश्न विचारताना त्यांनी आपला जीव धोक्यात घातला…
Mother murder daughter Nagpur, Nagpur,
प्रेमात अडसर ठरणाऱ्या सख्ख्या मुलीचा आईनेच केला खून, मृतदेहाची विल्हेवाट…
Deepshikha in investigative journalism Nellie Bly
शोधपत्रकारितेतील दीपशिखा
Pandurang Ulape Kolhapur
“..आणि मृत घोषित करण्यात आलेले आजोबा जिवंत झाले”, कोल्हापुरात घडली अविश्वसनीय घटना

आणखी वाचा : “शरीरसंबंध ठेवले तरच…” प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; आयुष्मान, रणवीरच्या नावाचाही उल्लेख

समांथा पुढील वर्षी ‘सिटाडेल’ या हिंदी सिरीजमध्ये दिसणार होती. पण तब्येतीमुळे तिने या प्रोजेक्टला नकार दिल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण समांथा अजूनही या सिरीजचा एक भाग आहे अशी बातमी नुकतीच समोर आली आहे. ‘पिंकव्हिला’च्या वृत्तानुसार समांथाने या प्रोजेक्टला नकार दिलेला नाही. तिने तिच्या जानेवारी महिन्यातल्या तारखाही दिल्या आहेत. पण तिची उपलब्धता आणि तब्येत लक्षात घेऊन शूटिंगच्या अधिकृत तारखा निश्चित केल्या जातील.

हेही वाचा : समांथा रुथ प्रभूला झालाय गंभीर आजार, रुग्णालयातील फोटो शेअर करत म्हणाली…

ही सस्पेन्स सिरीज पुढील वर्षी ‘ॲमेझॉन प्राईम’वर प्रदर्शित होईल. सिरीज मध्ये अभिनेता वरुण धवनही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रुसो ब्रदर्स यांच्या इंग्रजी ‘सिटाडेल’ या सिरीजचे हे हिंदी वर्जन आहे. जानेवारी महिन्यात या सिरीजच्या शूटिंगला सुरुवात होईल.

Story img Loader