‘इंडियाज गॉट लॅटेन्ट’ या ऑनलाइन टॅलेंट शोमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या डिप्रेशनवर करण्यात आलेल्या विनोदावरून मोठा वाद निर्माण झाला. यावरून या शोचा क्रिएटर आणि कॉमेडियन समय रैना याच्यावर टीका होत असूनही त्याने या वादाला गांभीर्याने न घेता, सोशल मीडियावर विनोदी उत्तर दिले आहे.

समय रैना याची इन्स्टाग्राम स्टोरी

सोमवारी (१८ नोव्हेंबर २०२४ रोजी) समय रैनाने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर रेडइटच्या नोटिफिकेशनचा एक स्क्रीनशॉट शेअर केला, ज्यामध्ये ‘दीपिकाच्या डिप्रेशनवरील विनोदाने वादंग निर्माण केला’ असे शीर्षक होते. या स्क्रीनशॉटबरोबर त्याने लिहिले, “जे लोक ट्विटर आणि अन्य सोशल मीडियावर माझ्यावर टीका करत आहेत, त्यांना एक विनंती – कृपया माझ्या यूट्यूब चॅनेलच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन नाराजी व्यक्त करा, त्यामुळे निदान मला त्या ट्रॅक्शनमधून काही रेव्हेन्यू मिळेल.” त्याने यासह त्या एपिसोडची यूट्यूब लिंकही शेअर केली आहे.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
People who laughed at my work and made fun of me are today giving compliments and saluting Bela Gram Panchayat
‘टीका करणारे आता कौतुकाचा वर्षाव करीत आहेत’…राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बेला गाव अन् महिला सरपंचाची अनोखी यशोगाथा
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Marathi actor Kushal Badrike funny post and share photos with wife
“आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!

हेही वाचा…Bigg Boss 18 मध्ये सलमान खानने भर मंचावर सुनावलं; आता ‘शार्क टँक’ फेम अशनीर ग्रोव्हर म्हणाला…

वादग्रस्त जोक नेमका काय होता?

‘इंडियाज गॉट लॅटेन्ट’ (India’s Got Latent) हा समय रैनाने तयार केलेला एक ऑनलाइन टॅलेंट शो आहे. शोच्या नवीन भागात समयबरोबर तन्मय भट, रघु राम, न्यूरोलॉजिस्ट डॉ. सिड वॉरियर आणि बलराज सिंग घई हे परीक्षक पॅनेलमध्ये सहभागी झाले होते. याच भागात एक स्पर्धक बंटी बॅनर्जीने दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) यांच्या मुलीच्या जन्मावर विनोद करत म्हटले, “दीपिका पदुकोण नुकतीच आई झाली आहे, नाही का? छान, आता तिला खरं डिप्रेशन कसं असतं ते समजेल.”

samay raina reply on deepika padukone depression joke backlash
दीपिका पदुकोणच्या डिप्रेशनवर करण्यात आलेल्या विनोदावरून ‘इंडियाज गॉट लॅटेन्ट’शोचा क्रिएटर आणि कॉमेडियन समय रैना याच्यावर टीका होत असूनही त्याने या वादाला गांभीर्याने न घेता, सोशल मीडियावर विनोदी उत्तर दिले आहे. (Photo Credit – Samay Raina/ Instagram)

हा विनोद ऐकून समय रैना (Samay Raina) आणि इतर परीक्षक मंडळाने हसत टाळ्या वाजवल्या. मात्र, या प्रकारामुळे शो आणि परीक्षक मंडळावर सोशल मीडियावर टीका होऊ लागली आहे.

हेही वाचा…Pushpa 2 : “श्रीवल्ली मेरी बायको…”, जबरदस्त डायलॉग अन् अल्लू अर्जुनचा हटके अंदाज; ‘पुष्पा २’चा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

सोशल मीडियावर संताप

शोमध्ये दीपिकाच्या मानसिक आरोग्याबाबत केलेल्या जोकमुळे अनेक प्रेक्षक नाराज झाले. यावर एका रेडइट युजरने लिहिले, “हा विनोद लोकांना विनोदी वाटत नाही, कारण तो मानसिक आरोग्याच्या समस्येचा उपहास करतो. अशा विनोदांचा हेतू ‘पंचिंग डाऊन’ म्हणजे खाली पाडणं असतो, जे एक मूर्खपणाचं उदाहरण आहे.”

netizens backlash on deepika padukone joke on indias got latent show
‘इंडियाज गॉट लॅटेन्ट’ या ऑनलाइन टॅलेंट शोमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या डिप्रेशनवर करण्यात आलेल्या विनोदावरून नेटकऱ्यांनी या शोवर टीका केली आहे. (Photo Credit – Reddit)

हेही वाचा…‘या’ कारणामुळे शाहरुख खानने ‘करण अर्जुन’ करायला दिला होता नकार, आमिर खानची लागली होती वर्णी, पण…

परीक्षक मंडळावरही जोरदार टीका करण्यात आली. एका युजरने लिहिले, “पॅनेल कधी कधी खूप मजेदार असतं, पण काही वेळा असं वाटतं की ‘कॉमेडी’च्या नावाखाली तुम्ही काय करत आहात?” या प्रकारानंतर समय रैनासह या शोच्या पॅनेलमधील कॉमेडियन तन्मय भट्ट (Tanmay Bhatt) आणि इतरांवरही नेटकरी जोरदार टीका करत आहेत.

Story img Loader