सरकारी अधिकारी समीर वानखेडे हे महाराष्ट्रात चर्चेत राहणारं नाव आहे. आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर त्यांची खूप चर्चा झाली होती. त्यांनी नुकतीच लोकप्रिय मराठी चॅट शो ‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये हजेरी लावली. यावेळी समीर यांना त्यांच्या कामाबद्दल व वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्या प्रश्नांची त्यांनी मोकळेपणाने उत्तरं दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाहरुख खान की नवाब मलिक, सर्वात जास्त राग कुणाचा येतो? समीर वानखेडे म्हणाले, “कुठला…”

समीर यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर आहे. समीर व क्रांती यांचा प्रेमविवाह आहे. त्यांना क्रांतीशी लग्न करण्याबद्दल अवधूत गुप्तेने प्रश्न विचारला, त्यावर ते काय म्हणाले ते पाहुयात. सरकारी नोकरीत असणारे त्यांच्याच क्षेत्रात सोयरिक करतात. मग तुम्ही क्रांतीला कुठे शोधलं? असा प्रश्न अवधूत गुप्तेने विचारला. त्यावर समीर यांनी दोघेही एकत्र शिकत होते, असा खुलासा केला.

विमानतळावर तुम्ही मुद्दाम सेलिब्रिटींची जास्त तपासणी करता? समीर वानखेडे म्हणाले, “ज्यांना तुम्ही सेलिब्रिटी वगैरे म्हणता…”

“लोक माझ्यावर टीका करतात की ते अमूक-अमूक लोकांना पकडतात आणि त्यांची पत्नी चित्रपट कलाकार आहे. पण लोकांना माहीत नाही की ती माझी जुनी मैत्रीण आहे. आम्ही रुईया कॉलेजमध्ये एकत्र होतो. तेव्हापासून मी तिला आवडायचो, नंतर आम्ही लग्न केलं होतं,” असं समीर यांनी सांगितलं. ‘तुम्ही कॉलेजमध्ये तिला प्रपोज केलं नाही का?’ असं विचारलं असता समीर म्हणाले, “नाही, इगो इश्यूज असतात ना, त्यामुळे मी अप्रोच केलं नाही. पण मलाही ती आवडायची. मग तिनेच मला विचारलं. मलाही तिच्याशी लग्न करायचं होतं.”

दरम्यान, समीर व क्रांती यांना दोन मुली आहेत. समीर वानखेडे यांच्या कामाच्या स्वरुपामुळे अनेकदा वानखेडे कुटुंबियांना धमक्या येतात, तेव्हा क्रांती पतीची बाजू मांडताना दिसते. आर्यन खानला अटक केल्यानंतर समीर वादात सापडले असतानाही क्रांती पतीची बाजू घेत ठामपणे उभी राहिली होती.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sameer wankhede reveals kranti redkar proposed him they studied together hrc